Cholesterol : Beer प्यायलामुळे खरंच कोलेस्ट्रॉल कमी होतं? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
Drinking Beer Daily : आजकाल तरुणाईमध्ये मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण आवडीने Beer पितात. त्यामुळे रोज Beer पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्ट्सनुसार बियर प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहतं.
Beer is Good For Cholesterol : कोलेस्ट्रॉलमुळे (Cholesterol) आज अनेक त्रस्त आहेत. कामाचा वाढलेला ताण, अनहेल्दी खाणं, अनेक चुकीच्या सवयीमुळे कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. या कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटक्यापासून (heart attack) वजन वाढीची समस्या होते. तसं तर आपल्या शरीरात गूड आणि बॅड असे दोन्ही कोलेस्ट्रॉल असतात. पण वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे अन्यथा आपण अनेक आजारांना निमंत्रण (how to control badcholesterol at home) देतो. दरम्यान रोज बियर पिण्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण रिपोर्ट्सनुसार बियर प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहतं. याचा अर्थ आम्ही आणि कुठलेही तज्ज्ञांना तुम्हाला बियर पिण्याचा सल्ला देत नाही आहोत. (How to control cholestrerol)
Beer प्यायलामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतं?
एका रिपोर्ट्सनुसार बिअर प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, असा दावा करण्यात आला आहे. यात काय तथ्य आहे ते जाणून घेऊयात. बिअर पिण्याबाबत अनेक दावे केले जातात आहे. काही अभ्यासानुसार बिअरमध्ये अल्कोहोलची पातळी 5 ते 7 टक्क्यांपर्यंत असते. याशिवाय हे पेय अँटिऑक्सिडंट्स, खनिजयुक्त असतात. त्यामुळे एका अहवालानुसार या गोष्टी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. पण त्यातही तुम्हाला अनेक काळजी घेण्याची गरज आहे. (beer drinking really reduce cholesterol Find out what the experts say in marathi news)
मधुमेहमध्ये बिअर चांगली की...? (Beer is good for diabetes)
याबाबत तज्ज्ञांचं मत आहे की, कोणत्याही प्रकारचे अल्कोहोलिक पेय पिल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी खराब होते. ज्या पुरुषांना मधुमेहाचा त्रास असेल त्यांनी अधूनमधून पण बिअर पिले तरी त्यांचा ग्लुकोज संवेदनशीलता विकसित होण्याचा धोका जास्त प्रमाणात वाढतो.
असा पण एक दावा!
बिअर कमी प्रमाणात पिणे हे तुमच्या शरीराला सकारात्मक मार्गाने मदत करु शकतं. पण हा निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा एकमेव मार्ग नाही. निरोगी राहण्यासाठी कायम संतुलित आहार, पुरेशी झोप आणि योगा हे महत्त्वाचे आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते महिलांसाठी एक ग्लास आणि पुरुषांसाठी जास्तीत जास्त दोन ग्लास बिअर आरोग्यासाठी चांगली आहे, असं म्हणतात.