Weight Loss Tips : स्वस्त आणि मस्त ज्यूसमुळे वजन कमी करणं झालं सोपं
`या` स्वस्त ज्यूसच्या सेवनाने करा वजन कमी, फक्त जाणून घ्या योग्य पद्धत आणि वेळ
Weight Loss Tips : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. स्पर्धेच्या महागाईच्या विश्वात प्रत्येक जण करियरच्या मागे धावत असताना आरोग्य आणि रोजच्या जीवनशैलीमुळे अनेक शारीरिक समस्या (physical problem) डोकं वर काढतात. त्यातील एक म्हणजे सतत वाढणारं वजन. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे ज्यूस आणि व्यायम (Juice and exercise) प्रकार करत असतो.
पण एक ज्यूस आहे ज्यामुळे तुम्ही वजन कमी करू शकता (Weight Loss Tips ). वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त असलेल्यांपैकी तुम्हीही असाल तर बीटचा ज्यूस तुमचं वजन कमी करण्यास मदत करू शकतो. (Can I drink beetroot juice everyday?)
ज्यूस कसा बनवायचा? (How to make beetroot?)
प्रथम तुम्हाला एक चिरलेला बीट, नंतर दोन नाशपातीचे तुकडे, अर्धी कापलेली काकडी, एक चमचा आले, एक चिरलेला गाजर, पुदिन्याची पाने, दोन चमचे काळी मिरी आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या. सर्वप्रथम बीट, नाशपाती, काकडी, आले आणि गाजर मिक्सरमधून बारीक करून घ्या. (Apple, Beetroot, Carrot)
बारीक केल्यानंतर मिश्रण चाळून घ्या. त्यात मीठ, मिरी आणि लिंबाचा रस मिसळावा आणि या ज्यूसचा रोजच्या आहारात समावेश करावा. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास सुरुवात होईल.
बीट आरोग्यास लाभदायक
या ज्यूसमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे पचनसंस्थेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. बीटच्या ज्यूस आणखी एक फायदा म्हणजे ज्यूस प्यायल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही. (Beet is beneficial for health)
बीटमध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, लोह, व्हिटॅमिन बी1, बी2 आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
ज्यूस पिण्यासाठी योग्य वेळ
जर तुम्हालाही वाढतं वजन झपाट्याने कमी करायचं असेल तर तुम्ही सकाळी नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळी याचे सेवन करू शकता. जर तुम्ही रसामध्ये काकडी आणि लिंबाचा समावेश केला असेल तर रात्रीचे सेवन करू नका अन्यथा तुम्हाला सर्दी, खोकला, सर्दी सारख्या समस्यांना उद्भवतील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)