Belly Fat: एक महिन्यात पोटाचा घेर होईल कमी, रोज करा हे काम
Weight Loss: लठ्ठपणा हा अनेकांना त्रासदायक ठरतो. लठ्ठपणामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. येथे आम्ही अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब केला तर तुम्ही एका महिन्यात पोटाची चरबी सहज कमी करु शकता.
How To Reduce Belly Fat: पोटाची चरबी वाढल्याने अनेकांना लाज वाटते. त्याच वेळी वाढलेल्या पोटामुळे लोक त्यांच्या आवडीचे कपडे घालू शकत नाहीत. एवढेच नाही तर लठ्ठपणामुळे अनेक आजार जडतात. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही किंवा जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब करुन तुम्ही एका महिन्यात पोटाची चरबी कमी करु शकता. ही चरबी सहज कमी करता येते.
या प्रकारे कमी करा पोटाची चरबी -
डान्स करुन पोटाची चरबी करा कमी-
पोटाची चरबी ही एक समस्या आहे. जी लोकांना खूप त्रास देते. बेली फॅट म्हणजे तुमच्या कंबरेभोवती साठलेली चरबी. पोटाच्या वाढत्या चरबीमुळे तुम्ही कोलेस्ट्रॉल, हाय बीपी इत्यादी गंभीर आजारांना बळी पडू शकता. म्हणूनच पोटाची चरबी वितळणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही कॅलरीजकडे लक्ष ठेवावे आणि अधिक कॅलरीज बर्न करण्यासाठी नियमित व्यायाम करावा. दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या बाहेर पडलेल्या पोटाचा त्रास होत असेल, तर तुम्ही दररोज एक तास डान्स करू शकता, असे केल्याने तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होईल आणि काही दिवसात बाहेर पडलेले पोट आत जाईल.
रोज सायकलिंग करा-
जर तुम्हाला जिममध्ये न जाता पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही सायकलिंग करु शकता जिथे तुमच्या पोटाची चरबी काही दिवसात लोण्यासारखी वितळेल. हे करण्यासाठी तुम्ही कधीही निवडू शकता.
रोज क्रंचेज करा-
पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी व्यायाम म्हणजे क्रंच. जेव्हा आपण पोटाची चरबी कमी करण्याबद्दल बोलतो तेव्हा क्रंचचा व्यायाम सर्वात वरचा असतो. म्हणून तुम्ही हा व्यायाम रोज करु शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)