मुंबई : अनेकदा कंबरेभोवती वाढणाऱ्या फॅटमुळे अनेक लोकं त्रस्त असतात. कमरेजवळ साठलेल्या चरबीला बेली फॅट म्हणतात. पोटाची चरबी तुमचा संपूर्ण लुक खराब करू शकते. त्याच वेळी, पोटाची चरबी कमी झाल्यामुळे, तुम्हाला जीन्स घालण्यात देखील त्रास होऊ शकतो. पोटाचा घेर कमी करण्याचे अनेक प्रयत्न करूनंही ही चरबी कमी करता येत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही देखील पोटाच्या चरबीने त्रस्त असाल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की पोटावर चरबी असण्‍याचं कारण काय असू शकतं. 


यकृत डिटॉक्स न होणं


जर तुमचे यकृत योग्य पद्धतीने डिटॉक्स होत नसेल तर तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. एवढंच नाही तर तुमच्या पोटावर फॅटही वाढू शकतं. आठवड्यातून एकदा यकृत डिटॉक्स करणं खूप महत्वाचं आहे. 


पुरेशी झोप न घेणं


जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुम्हाला बेली फॅटची समस्या जाणवेल. दुसरीकडे, जर तुम्हाला नीट झोप येत नसेल, तर तुम्ही चिमूटभर दालचिनी घालून कॅमोमाइल चहा घेऊ शकता. असं केल्याने तुम्हाला रात्री चांगली झोप येऊ लागते. 


कमी प्रोटीनचा नाश्ता


तुम्हाला माहितीये का की, प्रोटीन भूक कमी करण्यास आणि जास्त खाणं टाळण्यास मदत करतात. 30 टक्के कॅलरीजमध्ये प्रोटीनच सेवन वजन कमी करण्यासाठी चांगलं आहे. एवढंच नाही तर ते तुमचा मेटाबॉलिक रेट देखील वाढवते. तसंच वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये डाळींचा समावेश करू शकता.