Belly Fat : पोटाच्या चरबीमुळे (Belly Fat ) आजकाल अनेकजण त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण विविध पद्धतींचा अवलंब करतो. मात्र अनेकांना जिममध्ये (gym) जाऊन घाम गाळायला वेळ मिळत नाही. म्हणूनच काही चांगल्या सवयी (Good habits) आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही सकाळी खूप वजन कमी करू शकता. या कामांमुळे शरीरातील चरबी कमी होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसं कमी कराल बेली फॅट


कोमट पाणी


पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी लवकर कोमट पाणी पिणं खूप फायदेशीर आहे. पाणी शरीराला समान प्रमाणात हायड्रेट करतं. तसंच कोमट पाण्यात मध किंवा लिंबू मिसळून प्यायल्यानेही चरबी बर्न सुरुवात होते.


नाश्त्यासाठी प्रोटीन आणि फायबरचा समावेश


प्रोटीन आणि फायबरने भरलेला नाश्ता खाल्ल्याने दिवसभर भूक कमी होते. अशा न्याहारीमुळे दिवसभर शरीराला उर्जा मिळते आणि दर तासाला होणारी भूक देखील दूर राहते. परिणामी अन्नाचं सेवन कमी होतं. तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये अंडी, दही आणि काजू इत्यादींचा समावेश करू शकता.


पाण्याची बाटली


सकाळी पाणी पिण्याव्यतिरिक्त, तुम्ही नेहमी तुमच्यासोबत पाण्याची बाटली ठेवावी आणि दिवसातून किमान 2 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.


या चुकीच्या सवयींमुळे वाढतंय बेली फॅट


स्ट्रेसमध्ये खाणं


काही लोकांना ताणतणाव असताना प्रचंड भूक लागते. याला स्ट्रेस इटींग किंवा इमोशनल इटींग म्हणतात. या काळात, लोक जास्त फॅट असलेलं आणि साखरयुक्त पदार्थ खातात, ज्यामुळे पोटाची चरबी वाढू शकते.


सतत खाणं


जेंव्हा तुम्ही काहीही खाता त्यावेळी ते शरीराला ते पचायला वेळ लागतो. मात्र काही लोकं कमी वेळेत जास्त वेळा खातात. त्यामुळे पचनसंस्थेला फॅटचा योग्य वापर करता येत नाही. हे फॅट शरीरावर जमा होऊ लागतं. परिणामी बेली फॅट वाढतं.