Fat Burning Exersice: वाढत्या वजनाने आजकाल अनेक जण त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी खासकरून पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी आपण विविध प्रकारचे उपाय करतो. यामध्ये डाएट, जीम तसंच योगा यांचा समावेश असतो. मात्र अनेकदा यामुळे देखील काहीही फरक पडत नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला केवळ एक 5 मिनिटांचा व्यायाम सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या 5 मिनिटांच्या Exersice ने तुम्हाला जीम किंवा डाएटचा देखील विचार करावा लागणार नाहीये. इतकंच नाही तर तुम्हाला कोणतंही स्ट्रिक डाएट रूटीन फॉलो करावं लागणार नाहीये. चला तर मग जाणून घेऊया, ही 5 मिनिटांची एक्सरसाईज नेमकी कशी आहे. 


5 मिनिटांत करा पोटावरील चरबी कमी


बेली फॅट कमी करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही अनेक एक्सरसाईज केले असतील. मात्र आम्ही जी एक्सरसाईज सांगणार आहोत, त्यामुळे तुमच्या शरीरातील प्रत्येक भागातील चरबी बर्न होण्यास मदत होणार आहे. मात्र खासकरून लोकांना पोटावरील फॅट बर्न करण्यास अडचणी येतात. मात्र या एक्सरसाईजने साईट फॅट कमी होण्यास देखील मदत होणार आहे. 


दररोज 5 मिनिटांसाठी करा हे Exersice


  • जंप स्क्वॉट

  • फॉरवर्ड लंज

  • नी ड्राइव

  • एयर स्क्वॉट

  • बॅकवर्ड लंज


जंप स्क्वॉट कसं कराल?


ही एक्सरसाईज तुम्हाला 40 सेकंदांपर्यंत करायची आहे. सर्वप्रथम पाय एक ते दीड फूट अंतरावर पसरवा. शरीराचा वरचा भाग सरळ ठेवून मांड्या वाकवून खाली वाका. आता खुर्चीप्रमाणे दिसणाऱ्या स्थितीत राहा. 


फॉरवर्ड लंज कसं करावं?


40 सेकंदांपर्यंत करावयची एक्सरसाईज सुरु करण्यासाठी तुम्ही सरळ उभे रहा. यावेळी पाय पुढे-मागे हलवून दोन पायांमध्ये 30 अंशांचा कोन तयार करा. आता हळूहळू गुडघे खाली करा. मागचा पाय हळू वाकवा आणि जमिनीवर ठेवा. काही वेळ अशाच स्थितीत रहा. पाय परत सरळ करून हा व्यायाम करत रहा.


नी ड्राइव करायची पद्धत


धावण्याच्या स्थितीत उभे रहा. शरीराचा वरचा भाग पुढच्या बाजूला आणून शरीर कंबरेच्या खाली म्हणजेच पाय मागच्या बाजूला असावं. एक पाय पुढे आणि दुसरा पाय मागे ठेवा. मागचा पाय पुढे घ्या आणि वर उचलताना दोन्ही हातांना पायाने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ही प्रक्रिया 5 वेळा पुन्हा करा. 


एयर स्क्वॉट असं करालं


सरळ उभे रहा आणि हात पुढे करून सरळ ठेवा. आता गुडघे थोडेसे वाकवा आणि शरीराचा वरचा भाग खाली आणा. काही वेळ या स्थितीत रहा आणि मागे राहा.
ही एक्सरसाईज 40 सेकंदांसाठी पुन्हा करा.


बॅकवर्ड लंज करण्याची पद्धत


कंबरेवर हात ठेवून सरळ उभे रहा. उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे घ्या. आता डाव्या पायाचा गुडघा वाकवून जमिनीवर ठेवा आणि उजवा पायही वाकवा. उजवा पाय मागे घ्या आणि त्याचा गुडघा जमिनीवर ठेवा. दोन्ही पायांनी ही एक्सरसाईज करा. दरम्यान 2 सेकंदांचा ब्रेक घेतल्यानंतर, 40 सेकंदांसाठी ही एक्सरसाईज करावी.