Belly Fat कमी करायचंय; आहारात केवळ `या` एका फळाचा समावेशही पुरेसा
आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदललेली जीवनशैली यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढतेय.
मुंबई : आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदललेली जीवनशैली यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढतेय. वजन कमी करणं हे कोणासाठीही सोपं राहिलेलं नाही. वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आणि व्यायाम करणं गरजेचं असतं. वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट घेतलं गेलं पाहिजे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फळं खाल्यामुळेही वजन कमी होतं. या फळांमध्ये संत्र्याचा समावेश आहे. संत्र्यांच्या सेवनाने पोटातील चरबी कमी होते.
संत्र करेल तुमचं वजन कमी खाल्ल्यामुळे असे वजन होईल कमी
पचनशक्ती मजबूत होते
संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं त्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. संत्री खाल्ल्यामुळे फार वेळ भूक लागत नाही. यामुळे दर काही वेळाने खाण्याची गरज पडत नाही आणि वजन वाढत आहे. पचनशक्ती मजबूत झाल्याने वजन कमी होण्यास किंवा नियंत्रित होण्यास मदत होते.
साखरेचं प्रमाण होतं कमी
वजन वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजं साखरेचं अतिप्रमाण सेवन होणं. जर तुम्ही दररोज एक संत्र खात असाल तुम्हाला साखर खावीशी वाटणार नाही. तसंच संत्र्यामुळे उच्च रक्तदाबाचं प्रमाण कमी होतं.
शरीरात पाण्याचे प्रमाण राहतं योग्य
संत्र्यामध्ये 80 टक्के पाणी असतं. त्यामुळे संत्री खाल्ल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही. वजन कमी करण्या प्रक्रियेत पाण्याचं प्रमाण कमी होणं योग्य नाही. संत्री खाल्ल्यामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राहतं. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नियमित संत्र खाल्लं पाहिजे.