कोरफडचे 5 गुणकारी फायदे
कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतात. जाणून घ्या कोरफडचे गुणकारी फायदे
मुंबई : कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतात. जाणून घ्या कोरफडचे गुणकारी फायदे
सतत कॉम्प्युटरसमोर बसल्याने डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दोन चमचे कोरफडीचा गर एक कप पाण्यात मिसळून त्याने डोळे धुवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
चेहऱ्यावर पुटकुळ्या आल्यास कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावा. थोड्या वेळाने चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे पुटकुळ्या कमी होतील.
शरीरावर कापल्यामुळे जखम झाली असल्यास त्यावर कोरफडीचा गर लावा.
कोंड्याची समस्या असल्यास दोन चमचे कोरफडीचा गर कंडिशनरसोबत मिसळा. यामुळे कोंड्यापासून सुटका होईल.
दातांच्या हिरड्या मजबूत करण्यासाठी हिरड्यांवर कोरफडीचा गर लावा.