Benefits of Coconut Water : नारळाच्या पाण्याचे हे फायदे तुम्हाला माहितीयत का?
हे दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत करेल. या शिवाय नारळाचे असे अनेक फायदे आहेत. ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.
मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. ज्यामुळे लोकं आपलं शरीर हायड्रेट ठेवण्याकडे लक्ष देत आहेत. कारण उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासते. ज्यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. परंतु या सगळ्यावर एक उत्तम पर्याय म्हणजे नारळाचं पाणी. रोज सकाळी नारळ पाण्याने जर तुम्ही दिवसाची सुरुवात केली, तर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक राहण्यास मदत होईल आणि डिहायड्रेशनपासून बचाव देखील होईल. या शिवाय नारळाचे असे अनेक फायदे आहेत. ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. चला तर मग नारळाचे आणखी काय फायदे आहेत. हे जाणून घेऊया.
1. वजन कमी करण्यास मदत
रोज सकाळी व्यायाम केल्यानंतर नारळ पाणी पिणे शरीरासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण हे पाणी प्यायल्याने पोट भरलेले राहते, ज्यामुळे भूक कमी लागते. त्यामुळे वजन कमी करण्यास हे शरीराला मदत करते. नारळ्याच्या पाण्यात कॅलरीज कमी प्रमाणात असतात.
2.मजबूत रोगप्रतिकार शक्ती
नारळाचे पाणी रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते. नारळात सुमारे 600 मिलीग्राम पोटॅशियम आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही चांगली होते.
3. डोकेदुखीच्या समस्येसाठी फायदेशीर
अनेक लोकांना डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास उद्भवतो. अशा वेळी नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरुन काढली जाते. नारळाच्या पाण्यात मॅग्नेशियम देखील आढळते. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास असलेल्या लोकांना नारळपाणी फारच चांगला पर्याय आहे.
4. रक्तदाब नियंत्रणात ठेवते
नियमित नारळ पाणी प्यायल्याने हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. यामध्ये आढळणारे व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे घटक रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या अनेक रुग्णांना दररोज नारळ पाणी पिण्याची शिफारस केली जाते.
5. उलट्या आणि जुलाब
उलट्या आणि जुलाबाच्या समस्येवरही नारळ पाणी अत्यंत उपयुक्त ठरते. जर तुम्हाला देखील यासंबंधीत त्रास होत असेल, तर नारळाचे पाणी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. नारळपाणी प्यायल्याने पोटातील जळजळ आणि अल्सर या समस्याही दूर होतात. नारळाच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते.