मुंबई : दरवर्षी 3 जून हा वर्ल्ड बायसिकल डे म्हणजेच जागतिक सायकल दिवस म्हणून मानला जातो. सायकल चालवण्याचा प्रकृती सोबतच आरोग्याला देखील पुरपुर फायदा होतो. नियमितरित्या सायकल चालवणं व्यक्तीला फीट आणि निरोगी ठेवतं. याशिवाय सायकल चालवल्यामुळे अनेक गंभीर आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. यामुळे चुकीची जीवनशैली सुधारली जाते. जाणून घेऊया जागतिक सायकल दिन का साजरा केला जातो आणि सायकल चालवल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2018 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी 3 जून रोजी जागतिक सायकल दिन म्हणून मानण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून मानला जातो. सायकल चालवल्याने आरोग्याला होणाऱ्या फायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला गेला. 


सायकल चालवण्याचे फायदे


सायकल चालवणं एक उत्तम एक्सरसाईज आहे. त्यामुळे सायकल चालवल्याने व्यक्तीचा व्यायाम देखील होतो.


सायकल चालवताना आपल्या शरीरातील अधिकतर मसल्स ग्रुप अॅक्टिव्ह होतात. ज्यामुळे फीटनेस जपण्यास मदत होते.


सायकल चालवल्याने स्टॅमिना आणि स्ट्रेंथ वाढण्यासही मदत होते. 


सायकलिंग वर्कआऊटला आपण आपल्या हिशोबाने कंट्रोल करू शकतो. जसं की, आपण याची इंटेंसिटी लो तसंच हाय करू शकतो. 


स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठीही सायकलिंग फायदेशीर ठरू शकते. 


सायकल चालवल्याने हाडांना मजबूती मिळण्यास मदत होते.


शरीरातील फॅट कमी होतं आणि वजन कमी होण्यासाठी सायकलिंग फायदेशीर ठरते.