मातीच्या मडक्यातील पाण्याने Acidity पासून मिळतो आराम; पहा काय आहे सत्य?
जाणून घेऊया उन्हाळ्यात मडक्याच्या पाण्याचे होणारे फायदे.
मुंबई : जुन्या काळातील व्यक्ती मातीच्या मडक्यातून पाणी पित असतं. मात्र आता फ्रिजपुढे मडक्याच्या पाण्याची चव अनेकांच्या जीभेवरून दूर गेली आहे. आता काही क्वचित लोकांच्या घरी मातीची मडकी दिसून येतात. मात्र तुम्हाला माहितीये का मडक्यातील पाणी तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर असतं. जाणून घेऊया उन्हाळ्यात मडक्याच्या पाण्याचे होणारे फायदे.
घसा खवखवत नाही
फ्रीजमधील पाणी फार थंड असतं आणि बाहेर ठेवलेलं पाणी गरम. मात्र मातीच्या मडक्यातील पाणी जास्त थंडही नसतं की जास्त गरमंही नसतं. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी योग्य असतं. खोकल्याचा त्रास असलेल्या व्यक्तीही मडक्यातील पाण्याचं सेवन करू शकतात.
मेटाबॉलिझम बूस्ट करते
जेव्हा आपण प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पितो तेव्हा त्यामध्ये बिस्फेनॉल A तसंच बीपीए यांसारखे विषारी घटक असतात. यामुळे शरीरातील टेस्टोस्टेरोनची पातळीही कमी होते. मात्र मडक्यातील पाण्याच्या सेवनाने टेस्टोस्टेरोनचा स्तर संतुलित राहतो आणि मेटाबॉलिझम उत्तम राहतं.
एसिडीटीपासून आराम
मानवी शरीराची प्रकृती एसिडीक असते आणि माती एल्कालाइन असते. त्यामुळे मडक्याचं पाणी आपल्या शरीराची एसिडिक प्रकृतीसोबत रिएक्ट करतं. हेच कारण आहे ज्यामुळे मडक्यातील पाणी प्यायल्याने एसिडीटी आणि पोटाच्या समस्यापासून आराम मिळतो.