मुंबई : आपल्या आरोग्यामध्ये पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. दिवसभरातून 3 - 4 लीटर पाणी आपल्या शरीरात जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या शरिरात पाण्याच प्रमाण अधिक असतं. म्हणून अनेकदा डॉक्टर देखील भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. सकाळी उठल्या उठल्या अनेकदा पाणी पिण्याचा सल्ला डायएेशिअन देतात. मग ते पाणी कधी कोमट असतं. तर कधी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा ब्रश न करता पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. थोडंस हे विचित्र वाटेल पण उठल्यावर फक्त चूळ भरून पाणी पिणं हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१) रोज सकाळी ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते. वजन घटवण्यास मदत होते.  


२) रात्री झोपताना तोंडात लाळ निर्माण होते. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वी थेट पाणी प्यायल्यास ही लाळही पोटात जाते. यामुळे शरीराला फायदा होतो. कारण लाळेत असणारे एंझाईम्स पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात. 


३) ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.


४) रोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सोबतच बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडीटी (पित्त) अशा समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते. 


५) जे लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पितात त्यांना कप होत नाही. सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे जे खाल्ले जाते त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. कप दूर झाल्याने अन्य आजारही पळून जातात.


६) सकाळी पाणी पिल्यामुळे गळा, डोळे, लघवी, किडनी बाबत ज्याकाही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते.