...म्हणून प्रेग्नेंसीमध्ये अवश्य खा तुळशीची पाने!
तुळस बहुगुणी, औषधी आहे, हे आपण सर्वच जाणतो.
मुंबई : तुळस बहुगुणी, औषधी आहे, हे आपण सर्वच जाणतो. अनेक आजारांवर तुळस उपयुक्त ठरते. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी तुळस गर्भवती महिलांसाठी वरदान ठरते. याची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुळशीचे सेवन अत्यंत सुरक्षित आहे. प्रेग्नेंसीमध्ये नियमित तुळशीचे सेवन केल्यास इंफेक्शनचा धोका कमी होतो. तुळशीच्या पानात अॅंटी बॅक्टेरीअल गुणधर्म असतात. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास तुळस फायदेशीर ठरते. तुळशीत हिलिंग क्वालिटी असते. त्याचबरोबर अॅँटी बॅक्टेरीअल आणि अॅँटी व्हायरल गुणधर्मही असतात. तर जाणून घेऊया प्रेग्नेंसीमध्ये तुळशीचे सेवन करण्याचे काही फायदे...
१. रोज तुळशीचे दोन पाने खाल्यास शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. कारण प्रेग्नेंसीमध्ये अधिकतर महिलांना अॅनेमियाची समस्या उद्भवते. अशा महिलांना दररोज तुळशीची दोन पाने खाण्याचा सल्ला दिला जातो.
२. तुळशीच्या पानात व्हिटॉमिन ए असते. गर्भाच्या विकासासाठी हे अतिशय आवश्यक तत्त्व आहे.
३. तुळशीच्या पानात मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. जे गर्भातील बाळाच्या हाडांच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक असते. त्याचबरोबर यातील मॅग्नेशियममुळे ताण, टेन्शन कमी होण्यास मदत होते.
४. तुळशीच्या पानात अॅंटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यामुळे आई आणि गर्भातील बाळ या दोघांनाही इंफेक्शनचा धोका कमी होतो.