गूळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
पदार्थांचा गोडवा वाढवण्याचे काम साखर, गूळ करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे पदार्थ असतात. साखरेचा वापर जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी काही पदार्थांमध्ये गूळच हवा. हा गूळ पदार्थांची गोडी वाढवत असला तरी त्याचेही अनेक आरोग्यवर्धक फायदे आहे.
मुंबई : पदार्थांचा गोडवा वाढवण्याचे काम साखर, गूळ करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे पदार्थ असतात. साखरेचा वापर जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी काही पदार्थांमध्ये गूळच हवा. हा गूळ पदार्थांची गोडी वाढवत असला तरी त्याचेही अनेक आरोग्यवर्धक फायदे आहे.
१. घसा बसल्यास गूळ आणि शिजवलेला भात एकत्र खाल्ल्यास फायदा होतो.
२. थकव्याचा त्रास जाणवल्यास गूळ आणि पाणी घ्यावे. आराम पडतो.
३. रोजच्या आहारात गुळाचा समावेश केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होते.
४. कान दुखत असल्यास गूळ आणि तूप एकत्र मिसळून घेतल्यास आराम मिळतो.
५. जेवणानंतर गूळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते. तसेच गॅसची समस्याही दूर होते.