मुंबई:  लिंबाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्याचा वापर खाद्यपदार्थांपासून सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो.  इतकेच नाही तर ते खूप चांगलं क्लिनर मानलं जातं. पण लिंबाप्रमाणेच त्याची सालं सुद्धा खूप फायदेशीर आहेत लिंबाच्या रसाप्रमाणे लिंबाची सालं देखील खूप फायदेशीर मानली जातात. लिंबाच्या सालीची पावडर बनवून साठवता येते. त्याचा उपयोग सौंदर्यापासून स्वच्छतेपर्यंत केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


ब्युटी रुटीनमध्ये वापरा


सहसा, लिंबाचा रस काढल्यानंतर आपण त्याची साले फेकून देतो. पण हे अत्यंत चुकीचे आहे. वास्तविक, लिंबाच्या सालीचा उपयोगही अनेक गोष्टींमध्ये करता येतो.


त्यात सायट्रिक ऍसिड असते, जे ब्लीचिंग एजंट आहे.  ब्युटी रुटीनमध्ये लिंबाचा रस खूप वापरला जातो.  त्याची साले फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांचा स्किन लाइटनर म्हणून वापरू शकता.  लेमन पील पावडरद्वारे तुम्ही हाताचे कोपरे, टाच  स्वच्छ करू शकता. हे पोर्स टाईट करण्यासाठी मदत करते.


 मुंग्या घरातून पळून जातील


जर तुम्हाला घराच्या खोलीत किंवा स्वयंपाकघरात मुंग्याचा त्रास होत असेल तर तुम्ही लिंबाच्या सालीचा वापर करू शकता.  यासाठी खिडकी, दरवाजा आणि इतर ठिकाणी (जिथून मुंग्या येतात) लिंबाची सालं ठेवा. लिंबाच्या सालीचा वापर केल्याने मुंग्या पळून जातील.
 
कॉफीचा मग साफ करा


अनेक वेळा कॉफी मगमध्ये  डाग पडतात .तुमच्याही कॉफी मगवर डाग पडले असतील तर ते काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर करा.  यासाठी लिंबाच्या सालीचा काही भाग डागलेल्या कॉफी मगमध्ये ठेवा.  नंतर त्यात पाणी भरा,तासभर राहू द्या आणि नंतर कापडाने स्वच्छ करा.


 सर्व भांडी चमकतील


बहुतेक घरांमध्ये तांबे, पितळ आणि स्टीलची भांडी वापरली जातात.  ते लिंबाच्या सालीने पॉलिश केले जातात.  यासाठी लिंबाचा तुकडा मिठात बुडवा.  तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात बेकिंग सोडा देखील वापरू शकता. मग कोमट पाण्याने स्वच्छ करा.