मुंबई : अमुक एक गोष्ट महिलांच्या आरोग्यासाठी हितकारक. तमुक एका गोष्टीचे परिणाम तुम्हाला थेट दिसणार हे तुम्हा आजवर ऐकलंच असेल. पण, पुरुषांच्या आरोग्याबद्दल मात्र फार कमीच बोललं जातं. मुळात पुरुषांचं आरोग्यही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धकाधकीचं जगणं, असंतुलित आहाराच्या सवयी, कामाचा वाढता व्याप आणि या साऱ्यातून निर्माण होणारा ताणतणाव या साऱ्याचेच परिणाम पुरुषांच्याही आरोग्यावर होताना दिसतात. पण, आहाराच्या सवयींमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केल्यास मात्र हा होणारा त्रास बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. (Benefits of Makhanas men will get helps in increasing sperm count)


तुम्हाला माहितीये का, पुरुषांनी मखाणा खाल्ल्यास याचे कैक फायदे त्यांना कळतील. शरीरात होणारे बदल पाहून तुम्हीही चकित व्हाल, असाच हा मखाना. 


हाडं बळकट होणार 
मखान्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटी ऑक्सिडेंट, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, झिंक आणि आयरन अशीही पोषक तत्त्व आहेत. याच्या सेवानानं स्पर्म काऊंट वाढतो. शिवाय हाडंही बळकट होतात. पुरुषांनी मखाने खाणं केव्हाही फायद्याचं. 


तणाव दूर होणार 
मखाणा खाल्ल्यामुळं तुम्ही ताणतणावापासूनही दूर राहू शकता. पुरुषांमध्ये इंफर्टिलिटीची समस्या उदभवत नाही.


स्नायूंची बळकटी 
जी मंडळी व्यायाम करत आहेत आणि ज्यांना स्नायूंची बळकटी अपेक्षित आहे त्यांनी खाण्यामध्ये मखाणा समाविष्ट करावा. मखाण्यामध्ये फॅट आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असून, प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळं वजन न वाढता स्नायू बळकट होतात. 



मखाणे खाल्ल्यामुळे हृदयही निरोगी राहतं. त्यामुळं हृदयासाठी मखाणा केव्हाही फायद्याचा. ज्यांना वारंवार ताप येतो अशा मंडळींनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानं मखाणे खावेत. 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे देण्यात आली आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)