तुमच्या किचनमध्ये ठेवाच `हा` पदार्थ; मधुमेही, कॅन्सर रूग्णांसाठी ठरतो फायदेशीर!
तुमच्या किचनमध्ये असलेल्या एक पदार्थ मधुमेही रूग्ण आणि कॅन्सरच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतात. याबाबत लोकांना माहिती नसते. चला जाणून घेऊया हा पदार्थ नेमका कोणता?
Benefits Of Pumpkin Seeds: ऑफिसमधील कामाचा तणाव, धकाधकीचं जीवन याचा परिणाम कमी वयातच आरोग्यावर व्हायला लागला आहे. डायबिटीज (Diabetes Treatment), हायपरटेन्शनसारख्या (Hypertension) आजारांनी तरुणांना गाठलं आहे. यापूर्वी पन्नाशीनंतर होणारा मधुमेह आता पस्तीशीतच आपले अस्तित्व दाखवायला लागला आहे. कमी वयात आजारांचं होत असलेलं निदान ही चिंतेची बाब आहे. औषधांचा आणि डॉक्टरांचा खर्च यात भरपूर पैसे खर्च होतात. मात्र, अनेक असाध्य रोगांवरील इलाज आपल्या घरातील स्वयंपाकघरातच आढळतात हे अनेकांना माहितीच नसतं. आज आम्ही तुम्हाला एका फळभाजीच्या बियांचे औषधी गुणधर्म सांगणार आहोत. या बियांमुळं मधुमेह ते कॅन्सरपर्यंतच्या आजारांवर रामबाण उपाय आहे. (Pumpkin Seeds And Diabetes)
प्रत्येकाच्या घरात भोपळ्याची भाजी आवर्जून बनवली जाते. भोपळा चिरताना त्यातील बिया या सर्रास टाकून दिल्या जातात. बियांचा वापर सहसा होत नाही. मात्र या बिया तुमच्या शारिरीक आरोग्यासाठी उपयुक्त असतात, हे तुम्हाला माहिती आहे का? भोपळ्याचा बिया अनेक आरोग्याच्या समस्यांवर गुणकारी ठरु शकतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन, फायबर, मॅगनीज, कॉपर, मॅग्निशियम, फॉस्फोरस, झिंक, आयर्रन आणि इतर अँन्टीऑक्सिडेंट्ससारखे औषधी गुण असतात. हे पोषकतत्व आरोग्याला फायदेशीर तर असतात पण त्याचबरोबर अनेक दुर्धर आजारांची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोगी ठरु शकतात.
काही संशोधनानुसार असं लक्षात आलंय की, भोपळा, त्याच्या बिया, भोपळ्याच्या बियांची पावडर आणि भोपळ्याचा रस हा मधुमेही रूग्णांसाठी फायदेशीर ठरतो. यामुळे ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते. दररोज योग्य प्रमाणात मॅग्नॅशियमचे सेवन केल्यास टाइप-2 मधुमेहाचा धोका 15 टक्क्यांनी कमी होत असल्याचं संशोधनातून समोर आलंय. भोपळ्यांच्या बियांमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण असल्याने या बिया मधुमेही रूग्णांसाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.
या दुर्धर आजाराचा धोका कमी करतील भोपळ्याच्या बिया
भोपळा आणि त्यांच्या बियांबाबत अनेक संशोधन करण्यात आलं आहे. यावेळी संशोधानातून असं समोर आलंय की, भोपळ्याच्या बियांमध्ये असे कपाऊंड्स असतात, जे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापासून बचाव करण्यास फायदेशीर ठरतात.
हृदयाच्या आरोग्यासाठी भोपळा फायदेशीर?
भोपळ्याच्या बियांमध्ये एँटीऑक्सिडंट, मॅग्नीशियम, झिंक, अनसॅच्युरेडेट फॅटसारखे गुणधर्म असतात. या गुणांमुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राखण्यास मदत होते.
भोपळा खाण्याची पद्धत
आता तुमच्या मनात प्रश्न असेल की, भोपळ्याच्या बियांचं सेवन कसं केलं पाहिजे. यांचं सेवन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे-
कच्च्या बियांवर मीठ टाकून तुम्ही खाऊ शकता
स्पेशल डिशमध्ये बियांचा वापर करु शकता
सॅलेड किंवा स्मुदीमध्ये त्याचा वापर करु शकता.
तव्यावर हलक्या प्रमाणात भाजून देखील यांचं सेवन करता येतं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)