Benefits Of Self Hugging : आनंदाचा किंवा दु:खाचा क्षण असो, अनेकदा आपल्या माणसांना मिठी मारून भावना व्यक्त केल्या जातात. मित्रमैत्रिणींचं भेटणं असो, प्रेमाच्या माणसाला पाहण्याचा आनंद असो; बऱ्याचदा हा आनंद मिठी मारून व्यक्त केला जातो. पण, शहरीकरणामध्ये मात्र अनेकदा या भेटीगाठी कमी होऊन एकटेपणा वाढतो आणि इथंच नाती तुटतात, संवाद नाहीसा होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानगरांमध्ये किंवा धकाधकीच्या जीवनात अनेकदा दैनंदिन कामाच्या व्यापात व्यक्ती इतक्या हरवून जातात की त्यांना स्वत:च्या भावना व्यक्त करण्याचाही वेळ मिळत नाही. हे तेच क्षण असतात जेव्हा खरी आपल्या माणसांची, त्यांच्या आधाराती आणि एका हक्काच्या मिठीची गरज असते. पण, जर कोणीच नसेल तर....?


एकाकीपणा दूर करण्यासाठी 'सेल्फ हग' अर्थात स्वत:ला मिठी मारण्याची पद्धत अवलंबली जात असून यामुळं बराच फरक पडतो असं निरीक्षणातून समोर आलं आहे. स्वत:वरच प्रेम करण्याची आणि स्वत:ला स्वीकारण्याचीच ही एक पद्धत. स्वत:वरील प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत किती फायद्याची माहितीये? 


तणाव दूर होतो- अतितणावाच्या वेळी जर तुम्ही स्वत:लाच मिठी मारली, तर यामुळं डोक्यामध्ये सुरु असणारे असंख्य विचार थांबून तणाव दूर होतो. 


हेसुद्धा वाचा : बातमी नोकरदार वर्गाच्या पैशांची; खात्यावर PF आला की नाही? EPFO च्या निर्णयामुळं...


नकारात्मकता दूर होते- अनेकदा काही आव्हानात्मक प्रसंगांमुळं आपल्याभोवती नकारात्मक वलय तयार होतं. अशा वेळी स्वत:लाच मिठी मारत धीर दिली असता नकारात्मकता दूर होते. 


मानसिकरित्या सक्षम- जीवन सुकर करण्यासाठी कायमच एका जोडीदाराची गरज असते असं म्हणतात. पण, जीवनाच्या या वाटेवर इतक्या परीक्षा असतात की, अनेकदा आपण एकटे पडतो. अशा वेळी स्वत:लाच वेळत देत मिठी मारावी. या सवयीमुळं मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत मिळते. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)