बातमी नोकरदार वर्गाच्या पैशांची; खात्यावर PF आला की नाही? EPFO च्या निर्णयामुळं...

EPFO Portal : भारतामध्ये नोकरदार वर्गासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडेंट फंडसंद्भातील फसवणुकीची प्रकरणं डोकं वर काढताना दिसत आहेत.   

सायली पाटील | Updated: Oct 9, 2024, 02:08 PM IST
बातमी नोकरदार वर्गाच्या पैशांची; खात्यावर PF आला की नाही? EPFO च्या निर्णयामुळं... title=
EPFO employees pf provident fund pf money employees epfo account

EPFO Portal : सायबर क्राईममध्ये होणारी वाढ सध्या चिंतेचा विषय ठरत असून, आता ही प्रकरणं थेट पीएफ खात्यापर्यंत पोहोचली आहेत. नोकरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येणाऱ्या पीएफ खात्यामध्ये सध्या फेरफार केली जात असून, या सर्व प्रकरणांना पूर्णविराम देत खात्यांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी EPFO येत्या काळात एक नवी प्रणाली लागू करणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

काही दिवसांपूर्वी स्पाईसजेटच्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांनी पीएफ खात्यात पैसे जमा केले न जाण्याचा आरोप केला होता. ज्यानंतर EPFO कडून कठोर पावलं उचलण्यात आली. त्यानुसार ज्या क्षणी पीएफ खात्यामध्ये पैसे जमा होतील तेव्हा खातेधारकांना तातडीनं एसएमएसच्या माध्यमातून त्याबाबतची माहिती दिली जाईल. 

का घेतला हा निर्णय?

अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांच्या खात्यातून PF चे पैसे कापतात. पण, हे पैसे खात्यावर जमा मात्र केले जात नाहीत, ज्यामुळं कर्मचाऱ्यांचं बरच नुकसान होतं. थोडक्यात या नव्या SMS प्रणालीमुळं आता कर्मचाऱ्यांना दर महिन्याला आपल्या पीएफ खात्यावर नेमके किती पैसे जमा होत आहेत याचा अंदाज येणार आहे. पैसे योग्य वेळी जमा झाले की नाही, पैसे जमा झाल्यानंतर खात्यात एकूण किती रक्कम आहे याविषयीची माहिती मिळेल. 

हेसुद्धा वाचा : Video: रागात चालत आला पोलिसांसमोरच BJP आमदाराच्या कनाशिलात लगावली अन्...

 

EPFO खात्यात नेमकी किती रक्कम आहे, कसं पाहाल? 

EPFO खात्यातील जमा रक्कम नेमकी किती आहे याविषयी जाणून घेण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करा. 
- EPF पोर्टलवर UAN आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगईन करा. 
- तुम्ही उमंग अॅपच्या माध्यमातूनही EPF खात्यावर जाऊन तिथं बॅलेन्स पाहू शकता. 
- 011-22901406 या नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही पीएफ खात्यातील बॅलेन्स तपासू शकता. 
- 7738299899 वर  EPFOHO UAN HIN असं लिहून मेसेज पाठवून तुम्हाला खात्यातील बॅलेन्स पाहता येईल.