Tulsi : दररोज उठल्यावर तुळशीची पाने खा, डायबिटीस सोबत `हे` पाच आजार जातील पळून!
तुळशीची पाने चाऊन खाल्यास डायबिटीससोबत 5 मोठे आजार देखील पळून जातील. वाचा काय आहेत (10 Benefits Of Tulsi) फायदे...
Health News : जर कोणाला डायबिटीस, मानसिक तणाव किंवा सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर, सकाळी उठून रिकाम्या पोटी तुळशीची पाने चाऊन खावीत. असं केल्यामुळं (Benefits Of Tulsi) तुमचे अर्धे आजार पळून जातील. तुळशीच्या रोपट्याला पवित्र रोपटं मानलं जातं. ज्या घरात तुळशीचं रोपटं असतं त्या घरात सुख-समृद्धीची कधीच कमी नसते, असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर आरोग्याला देखील त्याचे फायदेच फायदे आहेत.
तुळशीचे रोपटे हे केवळ धार्मिक रोपटे नसून त्याला आयुर्वेदेतातही अनन्यसाधारण महत्तव असलेलं रोपटं आहे. तुळशीची पाने चाऊन खाल्यास डायबिटीससोबत 5 मोठे आजार देखील पळून जातील. वाचा काय आहेत (10 Benefits Of Tulsi) फायदे...
डायबिटीस नियंत्रणात राहतो... (Diabetes)
तुळशीची पानांत कॅरियोफिलीन, मिथाइल युजेनॉल आणि युजेनॉल सारखे घटक असतात. तुळशीच्या पानांमुळे स्वादुपिंडाच्या बीटा पेशी योग्य प्रकारे काम करतात. तुळशीच्या पाने शरीरात इन्सुलिन सम प्रमाणात तयार करतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित रहाते व डायबिटीस (Diabetes remains under control) होण्याचा धोका कमी होतो.
डोकेदुखी जाईल पळून... (headache)
तुळशीची (Benefits About Tulsi) पाने इम्युनिटी वाढवण्याचे काम करतात. ज्या लोकांना थंडी वाजणे, डोकेदुखी आणि सायनस सारखे आजार असतात त्यांच्यासाठी तुळशीची पाने हा एक रामबाण उपाय आहे. यासाठी आधी तुळशीच्या पानांना गरम पाण्यात उकळून घ्या. त्यानंतर त्या पाण्याला गाळून कोमट करत ठेवा. त्यानंतर ते पाणी घोटा घोटाने प्या. त्यामुळे तुम्हाला आराम पडेल.
तणावापासून मिळेल सुटका : (Stress Relief)
अभ्यासाच्या अहवालानुसार, तुळशीमध्ये मानसिक तणाव कमी (Get relief from stress) करणारे कॉर्टिसॉल आढळून येते. जे लोकं तणावाचा सामना करीत आहेत, त्यांच्यासाठीसुद्धा तुळशीच्या पानांचे सेवन फायदेशीर आहे. तुम्ही रोज रिकाम्या पोटी 14 तुळशीची पाने चघळून खायला सुरुवात करा. याचा फायदा तुम्हाला लवकरचं दिसेल.
घश्याच्या खवखवीपासून देईल आराम... (Sore Throat)
ऋतु बदल्यानंतर घसा खवखवणे हे अगदी सामान्य मानले जाते. घश्याच्या खवखवीपासून लवकर आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांना उकळून घ्या. नंतर त्या पाण्याला चांगले गाळून घ्या आणि हे पाणी हळू हळू प्या. त्यामुळे तुमच्या गळ्याची खवखव व त्यामुळे घसा दुखण्यापासून (Gives relief from sore throat) आराम मिळतो.
आणखी वाचा - Winter Health Tips: हिवाळ्यात घ्या आरोग्याची खास काळजी, डिंकाचे लाडू खा अन्...
तोंडाच्या दुर्गंधी पासून मिळेल सुटका... (Bad Breath)
दरम्यान, श्वास व तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुळशीची पाने फायदेशीर ठरतात. तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची काही पाने तोडून ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आणि त्यांना थोडे थोडे करुन चघळा. तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर (Get relief from bad breath) होईल.