मुंबई : चेहरा हा मनाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. मनातील भाव चेहऱ्यावर उमटतात. त्याचबरोबर सौंदर्याचे प्रमुख अंग म्हणजे चेहरा. म्हणून सौंदर्य खुलवण्यासाठी आपण महागडे प्रॉडक्ट्स वापरतो, ट्रिटमेंट्स घेतो. पण आजकालच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण जीवनशैलीचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यामुळे चेहरा दिवसातून दोनदा धुणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते आणि त्वचाही चांगली राहते. पाहुया दिवसातून दोनदा चेहरा धुण्याचे फायदे...


आर्द्रता टिकून राहण्यास मदत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमित त्वचा स्वच्छ केल्याने त्वचा चांगली राहण्यास मदत होते. त्वचा मऊ, चमकदार होते, त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचेला नैसर्गिक आर्द्रता मिळते.


मृत त्वचा निघून जाते


फेसवॉश केल्याने चेहऱ्यावरील धूळ, माती, घाण, तेलकटपणा निघून जातो. त्याचबरोबर मृत पेशीही दूर होतात. त्यामुळे चेहरा उजळ, फ्रेश दिसतो.


तरुण दिसण्यासाठी


योग्य पद्धतीने चेहरा धुतल्याने त्यावरील अनावश्यक घटक दूर होतात. त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते. परिणामी त्वचेतील आर्द्रता टिकून राहते आणि तुम्ही तरुण दिसता.


रक्ताभिसरण सुधारते


चेहरा धुताना आपण फेसवॉश लावून चेहऱ्यावर काही वेळ हात गोलाकार पद्धतीने फिरवतो. त्यामुळे नकळत मसाज केल्यासारखे होते. परिणामी पेशी कार्यरत होतात आणि रक्ताभिसरण सुधारते. रक्ताभिसरण सुधारल्याने त्वचेवर चमक येते.