मुंबई : उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन वापरणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारचे सनस्क्रीन लोशन उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातले नेमके कोणते सनस्क्रीन निवडावे याबाबत तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता असते.त्यात SPF, UV-A, UV-B म्हणजे नेमके काय हे देखील अनेकांना माहीत नसते. म्हणूनच हा खास सल्ला नक्की जाणून घ्या. 


SPF म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर.यामुळे आपल्या त्वचेचे सुर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होते.या विशिष्ट प्रकारच्या सुर्यकिरणांमुळे त्वचेवर सनबर्न, टॅनिंग व स्कीन कॅन्सर होण्याची शक्यता असते. दिवसभर उन्हात फिरल्यामुळे या किरणांमुळे तुमची त्वचा काळंवडू शकते.  SPF १५ म्हणजे सुर्यकिरणांपासून पंधरापट अधिक संरक्षण होते.
 


एखाद्याला किती SPF ची गरज असू शकते?


भारतामध्ये येणा-या सुर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी SPF 30  पुरेसे आहे. जरी पाश्चात्य देशांपेक्षा भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिनील किरणे पोहचत असली तरी भारतीयांची सावळी त्वचा या सुर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी नैसर्गिकरित्या अधिक सुरक्षित असते. 


किती प्रकारचे सनस्क्रीन एजंट आहेत?


ऑर्गेनिक व मिनसल्स असे एकूण दोन प्रकारचे सनस्क्रीन एजंट्स असतात. ऑर्गेनिक एजंट अतिनील किरणे शोषून घेतात व त्वचेपासून त्यांचे संरक्षण करतात.त्यामधील अनेक घटक हे कार्य करतात.पण हे कार्य ३ ते ४ तासांसाठी मर्यादीत असते यासाठी सतत सनस्क्रीन लावणे गरजेचे असते.



फक्त SPF पाहून सनस्क्रीन विकत घ्यावे का?


SPF पासून फक्त UV-B प्रोटेक्शन होते पण UV-A प्रोटेक्शनची देखील तितकीच आवश्यता असते.UV-A सुर्य प्रकाशामुळे पिंगमेंटेशन,मार्क्स,फ्रॅकल्स,एजिंग व अॅलर्जी निर्माण होऊ शकते.यासाठी तुमच्या सनस्क्रीनमध्ये UV-B व UV-A असणे फार आवश्यक आहे.


UV-A प्रोटेक्शन देखील असलेल्या सनस्क्रीन मध्ये नेमके काय पहावे?


UV-A प्रोटेक्शन असलेल्या सनस्क्रीनमध्ये ‘+’ हे चिन्ह आहे का ते जरुर पहा.PA+ रेटींग युव्ही-ए प्रोटेक्शन दर्शविते.’शुन्य ते +++++’ कमी ते अधिक UV-A ब्लॉकींग दर्शविते. भारतीय त्वचेसाठी ‘++’ चांगल्या संरक्षणाची शिफारस करण्यात येते.यासाठी UV-B व UV-A संरक्षणासाठी SPF ३०++ सनस्क्रीन निवडा.


सनस्क्रीनचे फायदे काय आहेत?


UV-B व UV-A संरक्षण असलेल्या सनस्क्रीनचे अनेक चांगले फायदे आहेत.UV-A सुर्यप्रकाशामुळे पिंगमेंटेशन,एजींग या समस्या निर्माण होतात.त्यामुळे नियमित सनस्क्रीन लावल्यामुळे तुमची त्वचा नितळ  होते व तुम्ही तरुण दिसू लागता.UV-B सुर्यप्रकाशामुळे टॅनींग व स्कीन कॅन्सरचा धोका कमी होतो.त्यामुळे UV-B प्रोटेक्शन देखील गरजेचे असते.


नियमित सनस्क्रीन लावल्यामुळे तुमची त्वचा लवचिक,फ्रेश व निरोगी राहते.यासाठीच सुर्यप्रकाशात जाताना जाणिवपूर्वक सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देण्यात येतो.