Home remedies for immediate digestion: सणासुदीचे दिवस येतायत. अशात एकमेकांकडे जाणं होतं, वरचेवर खाणं होतं. एकतर आपली खराब लाईफस्टाईल अशात अधिकचं खाणं, यामुळे आपल्याला पचनाच्या समस्या सतावू शकतात. मात्र काही घरगुती उपयांनी तुम्ही पचनाची समस्या सोडवू शकतात. जाणून घेऊयात कसं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा तेलकट आणि मसालेदार जेवणामुळे, कमी पाणी पिण्याने किंवा तणावामुळे पचनाशी निगडित समस्या जाणवू शकते. अनेकांना जेवणानंतर काही तासांनीही अपचनाची समस्या जाणवते. एकदा अपचन झालं की अनेकजण एकवेळचं जेवणही स्किप करतात. अशात कोणते उपाय फायद्याचे ठरतील, पाहुयात. 


जेवण नीट चावून खा 


आपण कायम ऐकलं असेल की अन्न हे नीट चावून खावं. असं केल्याने आपल्या जेवणात तोंडातील लाळ नीट मिक्स होते. याने तुमची पचन शक्ती वाढते. तुम्ही खात असलेले घासही लहान ठेवा. असं केल्याने पचन शक्ती वाढण्यास मदत होते.


पाणी पिणं अत्यंत महत्त्वाचं


मानवी शरीराला पाण्याची गरज असते. जर तुम्ही कमी पाणी पीत असाल, तर तुम्हाला बद्धकोष्ट किंवा अपचनाची समस्या जाणवू शकते. म्हणून दिवसात किमान 8  ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. यासोबतच तुम्ही काकडी, टोमॅटो, खरबूज किंवा द्राक्ष यांसारखी फळेही घेऊ शकतात. 


दही खा 


अनेक जण जणं जेवताना किंवा जेवणानंतर दही खाणं पसंत करतात. मात्र जे असं करत नाही त्यांना जेवण खाण्याचा सल्ला आहे. दह्याला आपल्या नेहमीच्या जेवणाचा हिस्सा बनवणं पचनासाठी फायदेशीर असतं. दह्यामुळे पोटात थंडावा राहतो. सोबतच तुम्ही ताकाचा वापर केलात तर मसालेदार पदार्थांपासून होणार नुकसान कमी होण्यास मदत होते.


( विशेष सूचना - वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन जीवनात याबाबतचा वापर करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वरील माहितीबाबत सत्य किंवा असत्यतेची zee 24 taas पुष्टी करत नाही. )  


best home remedies for effective digetion