मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात सतत येणारा घाम यामुळे कपडे खराब होतात. अनेकदा नेहमीच्या पद्धतीने कपडे धुवूनदेखील घामाचे डाग जात नाहीत. अशावेळेस तुमचे आवडते कपडे असूनही केवळ डागांमुळे पुन्हा घालणं शक्य नसतं. म्हणूनच यापुढे तुम्हांला तुमच्या आवडत्या कपड्यांचा त्याग करावा लागू नये म्हणून या टीप्स लक्षात ठेवा.   


घरगुती उपाय - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरामध्ये असलेल्या काही पदार्थांमध्ये ब्लिचिंग क्षमता असते. यामुळे कपड्यावरील डाग हटवण्यास मदत होते. मग महागड्या लॉन्ड्रीमध्ये कपड्यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा या उपायांनी घरच्या घरीच हटवा कपड्यावरील घामाचे डाग.  


कोणत्या गोष्टी करतील मदत ? 


लिंबू -  


लिंबामध्ये ब्लिचिंग गुणधर्म असतात हे तुम्हांला ठाऊक आहे. सोबतच लिंबाचा मंद सुवास कपड्याला येणारा वासही दूर करतील. कपड्यावरील घामाचा डाग हटवण्यासाठी ते कपडे ओले करा. त्यावर लिंबाचा रस पसरा. दहा मिनिटांनी कोमट पाण्यामध्ये हे कपडे स्वच्छ धुवावेत. 


मीठ - 


मीठाच्या मदतीनेही घामाचे डाग हटवता येतात. याकरिता कपड्याला डाग पडलेला भाग थोडा ओला करा. त्यावर थोडे मीठ टाकून रात्रभर ठेवा. थोड्यावेळाने कपडे हलवा आणि त्यावर पुन्हा मीठ  घाला. सकाळी हे कपडे तुम्ही सामान्यपणे धुऊ शकता. 


व्हिनेगर - 


घामाचा डाग पडलेल्या कपड्यावर रात्रभर व्हिनेगर टाकून ठेवा. सकाळी कपडे सामान्यपणे धुवावेत. अशा पद्धतीने पांढरे कपडे धुणे टाळा.  


भांडी धुण्याचे लिक्विड  


कपड्यावरील घामाचे डाग हटवण्यासाठी भांडी धुण्याचे लिक्विडदेखील फायदेशीर आहे. याकरिता घामाचे कपडे भिजवा. त्यावर भांडी धुण्याचे लिक्विड पसरा. 30 मिनिटांनंतर कपडे स्वच्छ धुवावेत. 


जुना मोजा


घामाचा डाग पडलेला कपाडा ओला करून त्यावर जुन्या मोज्याने साबणाचे पाणी घालून घासा. त्यानंतर कपडे सामान्यपणे धुवावेत.