सावधान! तुमची मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेऊन बसतात का? होतील भयानक दुष्परिणाम
मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल वापरत असतील तर ही धोक्याची घटना आहे. कारण मोबाईलचा अती वापर यामुळे मुलांच्या शारिरीक आणि मानसिक स्वास्थावर गंभीर परिणाम होत आहे.
Mobile Addiction : तुम्ही मुलांना खायला घालताना मोबाईल दाखवता का... मुलं दिवसातून 3 तासांपेक्षा अधिक वेळ मोबाईल घेऊन बसतात का? तर मग ही मुलांसाठी धोक्याची घंटा आहे. तुमच्या मुलाला मोबाईलचं व्यसन लागलंय. डायबिटीज, कॅन्सर अशा घातक आजारांबाबत आपण ऐकलंय, पाहिलंय. मात्र, आता स्मार्टफोन नावाचा आजार प्रचंड वेगाने फैलावतोय. इतर आजारांप्रमाणेच हा देखील तेवढाच धोकादायक आहे.
स्मार्टफोन आजाराचा सर्वात जास्त विळखा बसतोय तो चिमुरड्यांना. लहान मुलांना स्मार्टफोन म्हणजेच मोबाईलचं व्यसन लागलंय. ऑनलाईन गेमिंग, OTT प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर लहान मुलांचा सर्वाधिक वेळ जातोय. लोकल सर्कल्स नावाच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती समोर आलीय. शहरातल्या 61 टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन 296 जिल्ह्यातल्या 46 हजार पालकांचा सर्व्हे करण्यात आला. शहरातल्या 61 टक्के लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय. 61 टक्के पालकांच्या म्हणण्यानुसार मुलं दिवसांतून 3 तासांपेक्षा जास्त वेळ मोबाईल घेऊन बसतात. 39 टक्के पालकांनी मुलं 1 ते 3 तास मोबाईल घेऊन बसतात असं सांगितलं. तर, 46 टक्के पालकांनी हे प्रमाण 3 ते 6 तास असल्याचं सांगितलं. 15 टक्के पालकांनी मुलांचं मोबाईल वापरण्याचं प्रमाण 6 तासांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं
मोबाईलचं व्यसन मुलांसाठी घातक
मुलांमध्ये मोबाईलचं व्यसन वाढल्याने त्याचे दुष्परिणाम दिसून येतायत. मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि आळशीपणा वाढल्याचं समोर आलंय.. अनेकजण मुलांना खायला घालताना मोबाईल दाखवतात. मात्र ही सवय लहान मुलांसाठी घातक आहे.मुलांचं मन मोबाईलच्या स्क्रीनवर स्थिर असेल, तर ते खाण्यापिण्याकडे लक्ष देऊ शकणार नाहीत. मुलांना खोकला येऊ शकतो, अन्न घशात अडकू शकतं मुलांना जेवणाची चव जाणवणार नाही, अन्न नीट पचत नाही.
मोबाईलमधून निघणा-या रेडिएशनने मेंदूंच्या पेशीवरही परिणाम
एवढंच नाही तर मोबाईलमधून निघणा-या रेडिएशनने मेंदूंच्या पेशीवरही परिणाम होतो. मेंदूमध्ये ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचत नाही. रेडिएशनमुळे कॅन्सरचाही धोका होऊ शकतो मोबाईलवर जास्त वेळ गेम खेळल्याने मुलांच्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. डोळ्यांची जळजळ होते. नजर कमजोर होण्याचा धोका असतो. स्मरणशक्तीवर परिणाम होऊन ती कमकुवत होते. विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता कमी होते. झोपेचं गणित विस्कळीत झाल्याने कामावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते
आता लोकल सर्कल्स मुलांच्या मोबाईल वापराची आकडेवारी केंद्र सरकारला देणार आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मोबाईल वापरासाठी परवानगीची मागणी करण्यात येतेय. सोशल मीडिया, ओटीटी किंवा गेमिंग प्लॅटफॉर्मवर वापरण्यासाठी पालकांची परवानगी बंधनकारक करावी अशी मागणी पालकांनी केलीय. मात्र सध्या तरी मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणंच हे त्यांच्या हिताचं आहे.