मुंबई: आरोग्यासाठी लाभदायक असलेल्या बिटाचा आणखी एक फायदा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या  संशोधनानुसार, दररोज बिटाच्या रसाचे सेवन केल्यास ह्रदयाचे आजार आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ गल्फच्या शास्त्रज्ञांनी यासंबधीचे संशोधन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, बिटामध्ये आढळून येणारे नायट्रेड रक्त नसांमध्ये पसरविण्यासाठी मदत करते. त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. या अध्ययनात सहभागी करण्यात आलेल्या २0 लोकांची दोन वेगवेगळ्य़ा गटात विभागणी करण्यात आली होती. त्यांच्यातील एका गटाला बिटाचा रस देण्यात आला व दुसर्‍या गटाला त्याच्याशी मिळताजुळता रस देण्यात आला, ज्याचा कोणताही प्रभाव पडत नाही. त्यानंतर केलेल्या तपासणीत असे आढळून आले की, ज्या लोकांनी बिटाच्या रसाचे सेवन केले होते, त्यांचा रक्तदाब दुसर्‍या गटातील लोकांच्या तुलनेत सामान्य होता. सोबतच ह्रदयाच्या आरोग्याशी संबंधित निकषांवरही त्यांची स्थिती पहिल्या गटापेक्षा चांगली दिसून आली.


संशोधकांनी नोंदवलेल्या निरीक्षणात मज्जसंस्थेमध्ये सक्रियता वाढल्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब तसेच रक्तवाहिनीतील आकुंचन यावर नियंत्रण राहण्यास मदत होत असल्याचे म्हटले. या अभ्यासासाठी वीस तरुणांनी सहभाग घेतला. यामध्ये त्यांच्या दोन चाचण्या घेण्यात आल्या. यात रक्तदाब, हृदयाचे ठोके, स्नायू आकुंचन तपासण्यात आले. 


बीटबाबत आणखी संशोधकांनी अधीक संशोधन केले आहे. त्यानुसार, व्यायाम करण्यामुळे आपल्या मेंदूतील ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. त्या वेळी बीटचा रस घेतल्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. यामुळे सोमॅटोमोटर कॉर्टेस बळकट करण्यासाठी योग्य वातावरण मिळते. याचा थेट परिणाम मेंदूवर होत असून, तो अधिक कार्यक्षम होण्यासाठी मदत होत असल्याचेही संशोधकांनी केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे.