वाढणारं Fat कमी करेल घरगुती मसाल्यातील पदार्थ, आजच आहारात वापरा
आपल्या देशात मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मुख्य म्हणजे हे सर्व मसाले कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आरोग्याला फायदेशीर ठरतात.
Black Cumin Seed Benifit: आपल्या देशात मसाल्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मुख्य म्हणजे हे सर्व मसाले कोणत्या ना कोणत्या कारणासाठी आरोग्याला फायदेशीर ठरतात. आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारा असाच एक मसाल्यातील पदार्थ म्हणजे काळं जिरं. जिऱ्याचा जेवणामध्ये समावेश केल्याने खाण्याची चव तर वाढतेच मात्र याशिवाय तुमची रोगप्रतिकारक क्षमताही वाढण्यास मदत होते.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची समस्या जाणवते. तज्ज्ञांच्या मतानुसार, जिऱ्याच्या सेवनामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. इतकंच नाही तर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहण्यासही जिरं मदत करतं. हे सामान्य जिऱ्यापेक्षा काळं जिरं अधिक फायदेशीर असल्याचं सिद्ध झालं आहे.
काळ्या जिऱ्याचे फायदे
काळ्या जिऱ्याच्या सेवनामुळे पोटदुखी, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत नाही. काळ्या जिऱ्याच्या पाण्याने तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळते. यामुळे तुमची चयापचय क्रिया चांगली होते आणि पचनक्रिया सुधारते.
लठ्ठपणा किंवा व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात अनावश्यक चरबी जमा होते. जास्त चरबी शरीरात साठली की वजन वाढू लागतं. तज्ज्ञांच्या असा विश्वास आहे की, काळ्या जिऱ्याच्या सेवनाने शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होते.
शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काळं जिरं फायदेशीर मानलं जातं. हे तुमची प्रतिकारशक्ती मजबूत करतं, ज्यामुळे ताप तसंच सर्दी यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. सर्दीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर काळ्या जिऱ्याचं सेवन केल्याने आराम मिळतो.