मुंबई :  स्वयंपाक घरात अनेक पदार्थ तयार करताना काळी मिरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. काळी मिरीची ओळख तशी फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून आहे. पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.काळी मिरीमध्ये अनेक औषधीय गुण आहेत. ज्याचा अनेक समस्यांवर उपाय म्हणून वापर केला जाऊ शकतो. पावसाळ्यात तर काळी मिरी होणाऱ्या सर्दी खोकल्यावर रामबाण उपाय आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सर्दी :  सर्दी झाल्यानंतर गरम दुधात काळी मिरी पूड टाकून हे दूध प्यावे. असं केल्यासं सर्दीवर आराम मिळू शकेल.


सर्दी, पडसे, खोकला :  सर्दी, पडसे, खोकला झाल्यास 8-10 काळे मिरे,10-15 तुळशीची पाने एकत्र करून त्याचा चहा प्यावा, आराम मिळतो.


घसा बसणे :  काळ्या मिरीची पूड, तूप आणि साखर एकत्र करून हे चाटण घेतल्यास बंद गळा मोकळा होतो. आवाज देखील चांगला होतो. 8-10 काळे मिरे पाण्यात उकळून या पाण्याद्वारे गुळण्या कराव्यात. यामुळे गळ्याला झालेला संसर्ग नाहीसा होतो.


कफ : 1 चमचा मधात 2-3 काळ्या मिर्‍यांची पूड आणि चिमूटभर हळद एकत्र करून खाल्ल्यास सर्दीमध्ये तयार होणारा कफ कमी होतो.


(अधिक सर्दी खोकला किंवा अन्य काही आरोग्याबाबत समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)