मुंबई : हलवा मासा हा पापलेटसारखा दिसत असला, तरी तो पापलेट म्हणजे पाँफ्रेटच्या कुळातील नाही. तो सहसा गडद तपकिरी आणि रूपेरी पापलेटसारखा दिसतो, म्हणून मासळी बाजारात त्याला हलवा म्हणतात. पापलेट मासा आणि हलवा मासा यांच्या चवीत देखील फरक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हलवा माशाचा पोटाकडचा भाग तपकिरी आणि फिकट असतो. तसेच पर जे असतात ते काळसर असतात. सर्वात महत्वाचं म्हणजे शेपटी पिवळसर असते, तिच्यावर तपकिरी रंगाचे तीन आडवे पट्टे देखील असतात.


आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर, कॅल्शियम, फॉस्फरस तसेच प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. पण यात चरबी ज्याला वसा देखील म्हणतात, त्याचं प्रमाण जास्त असतं.



पापलेट मासा मिळणारं ठिकाण हे भारतात पश्चिम किनार्‍यावर द्‍क्षिण कारवार आणि मलबार आणि पूर्व किनार्‍यावर विशाखापटनम् आणि नेलोर जिल्हा समजली जातात.