Black toe nail: चेहरा, हात यांची काळजी घेता घेता आपण पायांच्या सौंदर्याकडे बरयाचदा दुर्लक्ष करतो. पण पायांची काळजीघेन अतिशय महत्वाचं आहे. नाहीतर खूप मोठ्या समस्यांना आपल्याला समोर जावं लागू शकतमातीत काम न करता कोणतेही आजार नसतानाही काहींची पायांची नख काली पडलेली दिसतात अनेकांची नखं धूळ, मातीत न राहतादेखील काळवंडलेली दिसतात.प्रामुख्याने धावपटूंमध्ये ही समस्या आढळते. पण वरवर पाहता साधी वाटणारी ही समस्या अनेक गंभीर समस्यांचे संकेत देते. मग अशी काळवंडलेली नखं कोणत्या समस्यांमधील एक लक्षण आहे याकरिता हा एक्सपर्ट सल्ला नक्की जाणून घ्या.  


अवजड वस्तू पायावर पडणं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या अपघातामध्ये किंवा अनावधानाने एखादी जड वस्तू पायावर पडल्यास नखांखालील नसांचे नुकसान होते. नसा फाटल्यास रक्त साखळते. परिणामी नखांचा रंग बदलतो. यामध्ये वेदना जाणवतात. नखाजवळील अशा प्रकारचा रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.


पुन्हा पुन्हा त्रास जाणवणं 


लांब धावण्यासाठी फीटेट फूटवेअरचा वापर केल्यास त्याचा त्रास पायांना आणि नखांजवळील भागाला होतो. त्यामुळे खूप घट्ट शूज वापरू नका. सौम्य प्रकारच्या दुखण्यांमध्ये नख  वाढतात आणि काळसर भाग काढून टाकता येतो. मात्र त्रास खूपच जास्त असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वैद्यकीय उपचारांच्या मदतीने डेड नेल संपूर्णपणे काढून टाकता येते. काळवंडलेल्या नखाजवळील त्वचादेखील लालसर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.


स्कीन कॅन्सर 


एक गंभीर प्रकारचा स्कीन कॅन्सर हा नखांखालीच वाढतो. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. Melanoma या स्कीन कॅन्सरच्या प्रकारामध्ये वेदना फारशा जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष होते. नखांच्या पलिकडे क्युटिकल्समध्येही त्वचेचा रंग बदललेला असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.


फंगल टो नेल इंफेक्शन 


नखांना होणार्‍या इंफेक्शनमुळे त्यांचा रंग बदलण्याचा धोकाही वाढतो. नखांचा रंग निळा, पिवळा, हिरवा किंवा काळासर वाटत असेल त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. फंगल इंफेक्शनच्या तीव्रतेवरून पुढील उपचार ठरवले जातात. सौम्य स्वरूप असल्यास केवळ टॉपिकल औषधांनी त्यांना पूर्व वत केले जाते. तर स्वरूप गंभीर असल्यास काही औषध आणि लेझर ट्रीटमेंट केली जाते.