Black Turmeric Benefits: आपल्या रोजच्या जेवणात पिवळ्या हळदीचा (Turmeric Benefits) वापर केला जातो. जेवण रुचकर बनवण्यासाठी हळदीचा विशेष वापर केला जातो. त्याचबरोबर, हळद ही रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढवते. बहुगुणकारी असलेली ही हळद जखमेवर लावल्यास जखम भरण्यासही मदत होते. तसंच, रक्तही लगेच थांबते. आत्तापर्यंत तुम्ही पिवळ्या हळदीबाबतच ऐकलं असेल मात्र आयुर्वेदात काळ्या हळदीचे फायदेही (Black Turmeric Uses)सांगितले आहेच, काळ्या हळदीबाबत फारच मोजक्या लोकांना माहिती असते. आज आपण काळ्या हळदीचे आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घेऊया. (Health Benefits of Black Turmeric)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळ्या हळदीची लागवड प्रामुख्याने भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांमध्ये जास्त प्रमाणात केली जाते. आरोग्यासाठी काळी हळद लाभदायक असल्याचे म्हटले जाते. त्वचेची निगा राखण्यासाठी ही काळी हळद एखाद्या औषधाप्रमाणे काम करते. पण काळी हळद कशी वापरावी याबाबत अनेकांना ज्ञान नाहीये. आज काळ्या हळदीचे औषधी गुणधर्म आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण जाणून घेऊया. 


काळ्या हळदीत अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. काळ्या हळदीच्या सेवनामुळं कर्करोगाचा धोकादेखील कमी होतो. 


काळ्या हळदीचे चार फायदे


बोट चिरणे, रक्त येणे, भाजणे यासारख्या जखमा झाल्यास आपण लगेचच अँटीसेप्टीक क्रीम लावतो. मात्र, आपल्या आयुर्वेदातही औषधोपचापर सांगितले आहेत. तुम्हाला घरगुती उपाय करायचा झाल्यास जिथे जखम झाली आहे त्या ठिकाणी काळ्या हळदीची पेस्ट लावावी. असं केल्याने जखम लवकर भरुन निघेल. 


पचन होण्यास मदत होते


पोटाच्या तक्रारी असतील तर अशावेळी काळ्या हळदीचा वापर करा. काळी हळद पाचनक्षमता सुरळीत करते. पोटदुखी व गॅससारख्या समस्यांमुळं हैराण झाला असात तर काळ्या हळदीची पावडर तयार करुन गरम पाण्यात मिसळून प्या. 


त्वचेसाठी फायदेशीर


पिवळ्या हळदीबरोबरच काळी हळददेखील त्वचेसाठी लाभकारी आहे. मधासोबत काळ्या हळदीची पावडर मिसळल्यास चेहऱ्यावर ग्लो येईल. त्याचबरोबर चेहऱ्यावरील काळे डाग व पिंपल्सपासूनही सुटका मिळेल. 


सांधेदुखीसाठी फायदेशीर


वाढत्या वयाबरोबर सांधेदुखीचा त्रासही वाढीस लागतो. काळ्या हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट व अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळं सांधेदुखीची समस्या अधिक तीव्र झाली असेल तर ही पेस्ट तिथे लावा. यामुळं सूजही उतरेल. 


मासिक पाळी


सध्याच्या धावपळीच्या काळात मासिक पाळी अनियमित होणे हे समस्या सर्वच तरुणींना आहे. पाळी जर अनियमित असेल तर काही दिवस दुधामध्ये काळी हळद टाकून ते प्या. 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)