Blackheads Problem: ब्लॅकहेड्समुळे हैराण आहात का?; 1 मिनिटात होतील दूर, करा `हा` उपाय
तुम्हाला महागड्या प्रोडक्ट्स वर जास्त पैसे खर्च करायची गरज नाही.आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत...
Black Heads : नाक आणि हनुवटीची त्वचा काळी दिसत असेल किंवा व्हाइटहेड्समुळे तुमचा चेहरा विचित्र दिसत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण घरच्या घरी नैसर्गिक उपाय करू शकता. ब्लॅकहेड्स (Blackheads Cleaning Tips) किंवा व्हाइटहेड्सची (Home Remedies For Blackheads) समस्या कमी करण्यासाठी हे उपाय प्रभावी आहेत. योग्य पद्धतीने हे उपाय केल्यास केवळ पाच मिनिटांमध्ये या समस्येपासून तुमची सुटका होऊ शकते.
मुळात ब्लॅक हेड्स उष्णता, धुळ आणि आपली त्वचा हायड्रेट नसल्यामुळे ब्लॅक हेड्सचा त्रास सुरु होतो. त्यात घाबरण्याचे कारण नाही. कारण या त्रासाला 100 पैकी 95 लोक सामोरे जात असतात. ब्लॅक हेड्स आपल्याला नाक (Nose) आणि हनुवटीवर (Chin) जास्त येतात. ब्लॅक हेड्स जर एकदा आले की, चेहऱ्यावरुन जाणे कठीण आहे आणि जरी गेले तरी डाग चेहऱ्यावर राहतो. (Blackheads Problem Are you bothered by blackheads do this remedy)
ब्लॅक हेड्स हा काही त्वचेचा आजार नाही. चेहऱ्याची योग्य निगा राखली आणि उपाय केल्यास ब्लॅक हेड्सचे प्रमाण कमी होऊ शकते. यासाठी तुम्हाला महागड्या प्रोडक्ट्स वर जास्त पैसे खर्च करायची गरज नाही.आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत...
1. कोथिंबीर आणि हळद (Coriander and Turmeric)
कोथिंबीर आणि हळद याचे मिश्रण करून बारिक पेस्ट करुन घ्या. पेस्ट सॉफ्ट करण्यावर भर द्या. रात्री झोपताना ती पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा. या पेस्टमुळे तुमच्या ब्लॅक हेड्सची समस्या दूर होईल आणि चेहरा साफ होईल.
2. दही आणि ओटचे भरडे (Yogurt and oatmeal)
2 चम्मच दहीमध्ये 2 चमचे ओटचे भरडे मिक्स करा. त्यात 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा ऑलिव ऑइल मिक्स करुन चांगली पेस्ट तयार करुन घ्या. दही आणि ओटच्या भरड्यापासून तयार केलेले हे मास्क ब्लॅक हेड्स असलेल्या जागेवर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. हा मास्क तुम्ही आठवड्यातून 3 वेळा वापरु शकता.
3. जिलेटिन आणि दूध (Gelatin and milk)
जिलेटिन आणि दूध हे दोन्ही साहित्यांपासून फेसपॅक तयार करु शकता. जिलेटिन आणि दूध मिक्स केल्यावर 10 ते 12 मिनिटे तुम्ही माइक्रोवेव्ह मध्ये गरम करायला ठेवा. त्या मिश्रणाला ब्लॅक हेड्स असलेल्या जागेवर लावा. तुम्हाला चांगलाच फरक जाणवेल. तुम्ही आठवड्यातून एकदा हा मास्क वापरु शकता.
4. हळद आणि चंदन (Turmeric and sandalwood)
हळद आणि चंदन मिक्स करुन याची पेस्ट चेहऱ्याला लावा. या मिश्रणाला चेहऱ्यावर 20 ते 25 मिनिटे ठेवल्यास तुमचे ब्लॅक हेड्स कमी व्हायला मदत होते. चेहऱ्यावर ग्लो देखील दिसतो.
5. अंड आणि लिंबू (Egg and lemon)
अंड आणि लिंबू या दोघांना मिक्स करुन फेसपॅक तयार करता येतो. अंड्यात एक चमचा लिंबाचा रस मिक्स करुन त्याचा फेसपॅक चेहऱ्यास लावावा. फेसपॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा... निरोगी नातेसंबंध कसे असावे? हे सल्ले तुमच्या आयुष्यात नक्कीच फायदेशीर ठरतील