health tips : रोज सकाळी `ही` पानं उकळून प्या, `हे` होतील फायदे
आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पाणी प्यायल्यास कोणत्या समस्यांवर मात करता येते हे सांगणार आहोत.
curry leaves benefits : आपल्या आसपास अनेक औषधी पाने असतात. पण त्याचा योग्य वापर कसा करायचा हे आपल्याला माहित नसतं. अनेकदा अशी औषधी पानं खाल्याने अनेक फायदे होऊ शकतात. आज आम्ही कढीपत्त्याविषयी सांगणार आहोत. कढीपत्ता म्हटलं की फोडणी आठवते. भारतात फोडणीसाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्त्याचाशिवाय भाजी असो या डाळ कोणत्याही पदार्थाला चव नाही. पण तुम्हाला माहित आहे का की कढीपत्त्याचे पाणी जर प्यायले तर त्याचे अनेक आरोग्य फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला कढीपत्त्याचे फायदे सांगणार आहोत. आम्ही तुम्हाला कढीपत्त्याच्या पाणी प्यायल्यास कोणत्या समस्यांवर मात करता येते हे सांगणार आहोत. (Boil these leaves and drink them every morning nz)
हे ही वाचा - 'या' अभिनेत्रींचे फोटो पाहून आई म्हणाली हे ताबडतोब थांबवा.. ती वयाने लहान...
कढीपत्ता पाणी कसे बनवायचे?
तुम्ही एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या. आणि त्यात 10 ते 15 कढीपत्ता टाका. अर्धा ग्लास त्या पाण्याला चांगली उकळ आल्यावर ते गाळून पाणी प्या.
आणखी वाचा - 'हे' स्टार कपल बॉलिवूडपासून दूर.. डिवोर्सच्या बातम्यांना पुन्हा उधाण
कढीपत्त्याचे फायदे
1. जर एखाद्या व्यक्तीने कढीपत्त्याच्या पाण्याचे सेवन केले तर केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते असे नाही तर सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गापासून स्वतःचा बचाव ही करता येतो.
2. कढीपत्त्याच्या पाण्याने व्यक्तीच्या शरीरात लोहाचा पुरवठा होतो. लोहाच्या पुरवठ्यामुळे व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि हिमोग्लोबिनची पातळीही चांगली राहू शकते.
3. कढीपत्त्याचे पाणी शरीराला डिटॉक्स करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे शरीरातील घाण काढून टाकते तसेच हानिकारक कारणे आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास उपयुक्त ठरू शकते.
आणखी वाचा - शाहरुख खानच्या बायकोने केले कतरिना कैफच्या घराचे मेकओव्हर... पाहून व्हाल थक्क..
4. जर तुम्हाला तुमची रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. कोलेस्ट्रॉल हाय बीपीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे उपयुक्त आहे.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)