मुंबई : ' मर्द को दर्द नही होता' असं अनेकदा म्हटलं जातं. मुलींच्या तुलनेत मुलं भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत असल्याचं दाखवत असले तरीही त्यांनाही काही गोष्टींची भीती सतावत असते. म्हणूनच मुलांना 'या' काही गोष्टींबाबत गृहीत धरण्यापेक्षा त्यांना साथ देणे अनेकदा फायदेशीर ठरते. मग मुलींनो जाणून घ्या मुलांनाही कोणत्या गोष्टींची भीती सतावत आहे? 


मुलांनाही वाटत असते 'या' गोष्टीची भीती  


कमिंमेंट - 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांना 'कमिटमेंट' देण्याबाबत खूप भीती वाटत असते. अनेकदा रिलेशनशिपमध्ये अडकल्यानंतर त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आल्यासासारखं वाटतं. तर दुसरीकडे एकटेपणाच्या भीती साथीदार सोडून गेल्यास काय? ही भीतीदेखील असते. त्यामुळे 'कमिटमेंट' न देताही साथीदराने ते समजून घ्यावं असे त्यांना वाटत असते.  


वृद्धत्त्व - 


केवळ मुलींनाच नव्हे तर मुलांनाही त्यांच्या सौंदर्याची काळजी सतावत असते. मुलांना टक्कल, अकाली पांढरे होणारे केस आणि चेहर्‍यावरील सुरकुत्या यांची भीती वाटत असते.  


मुलांची जबाबदारी - 


मुलांची जबाबदारी आणि करियर यांच्यामधील मेळ साधणं जेवढं मुलींना आव्हानात्मक असते तितकीच किंबहुना थोडी अधिक जबाबदारी मुलांवर असते. आर्थिक गणितं सांभाळत मुलांना, पत्नीला सार्‍या गोष्टी पुरवणं याबाबत त्यांच्यावर दबाव असतो. 


पैसा - 


एका संशोधनानुसार, पुरूषांना वयाच्या उतारवयात दुसर्‍यांवर अवलंबून रहावं लागणं याची भीती वाटत असते. आर्थिक गणिताची भीती मुलांना कायम सतावत असते. त्यामुळे नोकरी, व्यवसाय याबाबत त्यांच्यावर दबावही अधिक असतो. 


नपुंसकता -  


ज्याप्रमाणे मुलींना वैवाहिक आयुष्यात त्यांच्या साथीदारांना पुरेसे लैंगिक सुख देता येईल की नाही ? याची भीती वाटत असते त्याप्रमाणेच ही भीती पुरूषांमध्येही असते. वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर संसार वाढवण्याच्या दृष्टीने मुलांवर एक दबाव असतो. त्यामुळे पुरूषांना 'नपुंसकते'विषयी भीती वाटत असते.