मुंबई : आपला मेंदू एक गुंतागुंतीचा भाग आहे. मेंदुचं कार्य समजून घेणे आणि त्यावर अभ्यास करणे खूप कठीण काम आहे. पण शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास केला, ज्यामुळे स्मरणशक्ती चांगली ठेवण्याचं काम करता येईल. गेलेली स्मरणशक्ती पुन्हा येऊ शकते, असं रिसर्च जर्नल ऑफ कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्सने म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रिसर्चमध्ये पुढील निष्कर्ष काढण्यात आला आहे. मेंदुच्या Left rostrolateral prefrontal cortex ला करंट देऊन उत्तेजित करता येऊ शकते. विसरलेल्या गोष्टी परत आठवू शकतात. या रिसर्चच्या सीनियर ऑथर यांनी सांगितले, मेंदुच्याLeft rostrolateral prefrontal corte या भागाची उत्तेजना वाढवली, आणि त्यांना आश्चर्य झाले. कारण लक्षात ठेवण्याची क्षमता वाढली. 


Left rostrolateral prefrontal cortex कपाळाच्या डाव्या बाजूला असते. विचारांवर काम करणे, तसेच मेंदुला येणाऱ्या सुचनांवर देखील हा भाग उपयोगी असतो.


यात सायकॉलॉजिस्ट यांनी प्रयोग करण्यासाठी तीन ग्रुप बनवले. यात २० वर्षापर्यंतचे लोक होते. प्रत्येक ग्रुपमध्ये १३ महिला आणि ११ पुरूष होते. प्रत्येक व्यक्तीला ८० शब्द दाखवले. हे शब्द त्यांच्या लक्षात आहेत का?, हे पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी आल्यावर त्यांना छोटे झटके देण्यात आले, ज्यामुळे  Left rostrolateral prefrontal cortex न्युरॉन्सची उत्तेजना वाढली.
 
थोड्यावेळात तीनही ग्रुपला वेगवेगळे प्रमाणात झटके दिले. एका ग्रुपच्या थोडी जास्त झटके देण्यात आले, आणि एकाला सामान्य झटके देण्यात आले. नंतर समजले की ज्यांच्या न्युरॉंन्सना जास्त उत्तेजना दिली, त्यांची स्मृती सर्वात चांगली झाली. 


या रिसर्चमुळे लोकांना विसरलेल्या गोष्टी पुन्हा आठवणीत परत आणण्यास मदत होणार असल्याचं रिसर्च जर्नल ऑफ कॉग्निटिव्ह न्यूरोसायन्सने म्हटलं आहे.