Break The Chain : योग्यरितीने मास्क न घातल्यास धोका वाढणार, डॉ. नेनेंचा सल्ला
नेमका मास्क कसा घालायचा?
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा नागरिकांना असह्य होत आहे. असं असतानाच महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशावेळी योग्य ते प्रकारची काळजी घेणे अत्यंत महत्वाचं आहे. कोरोनापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी मास्क हा महत्वाचा उपाय आहे. मात्र अनेकदा आपण मास्क चुकीच्या पद्धतीने घालत असल्याचं पाहतो. मास्कचा वापर हा कोरोना विषाणूला स्वतःपासून रोखण्यासाठी आहे. मात्र याचं अज्ञान अनेकांना घातक ठरत आहे.
अशावेळी डॉ. श्रीराम नेने यांनी योग्य प्रकारे मास्क कसा घालावा? याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी दोन मास्क घालताना कोणती काळजी घ्यावी? किंवा ते मास्क कसे घालावेत आणि कसे काढावेत याचा डेमो देखील दिला आहे.
त्याचप्रमाणे अनेकजण प्रवास करताना आणि फोनवर बोलताना मास्क नाका खाली घेतात. तसेच तो अनेकदा गळ्यात देखील अडकवतात. तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे.