वजन कमी करण्यासाठी करा भरपूर नाश्ता
संशोधकाच्या मते, सकाळचा नाश्ता भरपूर प्रमाणात केला पाहिजे. त्यामुळे वजन कमी होण्यास निश्चित मदत होईल. सकाळचा नाश्ता राजासारखा असला पाहिजे. तर रात्रीचे जेवण फकीरसारखे असले पाहिजे. पन्नास हजार लोकांवर केलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की, सकाळचा नाश्ता भरपूर केलेल्या लोकांमध्ये बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ची तुलना कमी होते. तर दुसरीकडे जे लोक दिवसभरात कमी जेवतात आणि रात्री खूप अवकाशाने खातात अशा दोन्हीं व्यक्तीमध्ये समान कॅलरीचा समावेश होतो.
मुंबई : संशोधकाच्या मते, सकाळचा नाश्ता भरपूर प्रमाणात केला पाहिजे. त्यामुळे वजन कमी होण्यास निश्चित मदत होईल. सकाळचा नाश्ता राजासारखा असला पाहिजे. तर रात्रीचे जेवण फकीरसारखे असले पाहिजे. पन्नास हजार लोकांवर केलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की, सकाळचा नाश्ता भरपूर केलेल्या लोकांमध्ये बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ची तुलना कमी होते. तर दुसरीकडे जे लोक दिवसभरात कमी जेवतात आणि रात्री खूप अवकाशाने खातात अशा दोन्हीं व्यक्तीमध्ये समान कॅलरीचा समावेश होतो.
अमेरिकेतील लोमा लिंडा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या संशोधकांच्या मते, सकाळचा नाश्ता आणि रात्री जेवणाच्या मधल्या वेळेचा संबंध हा जास्त असल्याने बीएमआय कमी होते. लेखिका हाना काहले ओवा यांच्यामते ''जास्त नाश्ता केला की भूख, तसेच मिठाई आणि वजन वाढवणाऱ्या गोष्टी खाण्याची इच्छा होत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
'काहले ओवा यांनी 'द टेलीग्राफ'ला दिलेल्या माहितीनुसार 'सकाळचा नाश्ता वेळेवर घेतल्याने बुद्धी वाढते. ऊर्जेचा एकूण वापर कमी होतो. आहार, गुणवत्ता सुधारते, ब्लडप्रेशर कमी होतो, इन्सुलिन सेन्सिटीविटी आणि ग्लुकोज टॉलरेस सुधारते. 'त्यांनी सांगितलं की, 'दुसरीकडे संध्याकाळच्या वेळेस जास्त खाल्याने विपरीत परिणाम होऊन शरीरावर वेगळा प्रभाव पडतो.'
संशोधकांच्या मते, लोकांनी निरोगी आणि योग्य वजनासाठी सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण केले पाहिजे. रात्रीचे उशीरा खाणे, स्नॅक्स खाणे टाळले पाहिजे. सकाळी नाश्ता करतांना जास्त आहार घेतला पाहिजे आणि रात्री कमीत कमी १८ तास काहीच खाल्लं नाही पाहिजे.