कॅलरीज बर्न होत नाहीयेत? मग केवळ फक्त अर्धा तास हे काम करून बघाच!
रोजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.
मुंबई : रोजच्या व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणं फार महत्त्वाचं असतं. पायी चालणं हा नेहमी एक उत्तम व्यायाम मानला जातो. मात्र बहुतांश लोकं चालणं याला व्यायाम मानत नाहीत. चालणं ही एक शारीरिक क्रिया आहे. आणि याचे बरेच फायदे आहेत.
कार्डियो फिटनेस वाढतो
पायी चालण्याने तुमच्या हृदयाचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करते. यासाठी, आठवड्यातून 5 दिवस कमीत कमी 30 मिनिटं चालणं आवश्यक आहे. तुम्हाला ही क्रिया नियमितपणे करण्याची आवश्यकता आहे.
कॅलरी बर्न होण्यास मदत
केवळ हेवी वर्कआउट्स आणि व्यायाम करून कॅलरी बर्न करू शकता असं नाही. तुम्ही चालण्याद्वारेही वजन कमी करू शकता. किती वजन कमी करायचं आहे आणि तुम्ही किती वेगाने तसचं किती दिवस चालत आहात यावर अवलंबून आहे.
एनर्जी बूस्ट होण्यास मदत
दिवसभर घरी बसून स्टॅमिना कमकुवत होतो. मात्र तुम्ही याची चिंता करू नका कारण काही काळ पायी चालण्याने तुम्ही उर्जेला चालना देऊ शकता. चालण्यामुळे, शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे नॉरेपाइनफ्रिन आणि एपिनेफ्रिन यांसारख्या हार्मोन्सची पातळी वाढते.