दिल्ली : कोरोना विषाणूविरोधात तयार करण्यात आलेली Covaxin आणि Covishield  लसी आता तुम्हाला केमिस्टच्या दुकानात मिळणार आहेत. DCGI म्हणजेच ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अखेर याला मंजूरी दिली आहे. काही दिवसांपूर्वी DCGI च्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीने कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी SEC महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीत सहभागी तज्ज्ञांनी कोव्हॅक्सीन आणि कोविशील्डच्या मार्केटिंग परवानगीसाठी भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिलेल्या अर्जांची पडताळणी केली. तसंच, गेल्या वर्षभरात दोन्ही लसींचे परिणाम आणि दुष्परिणाम यावरही चर्चा झाली.


सध्या देशात या दोन्ही लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता लसींच्या आपत्कालीन वापराची अट शिथील करण्यात आली असून खुल्या बाजारात आणण्याच्या निर्णयावर तज्ज्ञांचं एकमत झालं. डीसीजीआयच्या मंजूरीनंतर आता या कंपन्या लस सर्व रुग्णालयं आणि मेडिकल स्टोअरमध्ये विक्री करु शकणार आहेत.


मेडिकल स्टोअर्समधून लस विकत घेता  येणार


या निर्णयामुळे अद्याप कोणाला लसीचा डोस मिळाला नसेल, तर त्याला रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. तो व्यक्ती जवळच्या मेडिकल स्टोअरमधून लस विकत घेऊन कोणत्याही डॉक्टरकडून ती टोचून घेऊ शकतो. यामुळे देशात लसीकरणाचा वेगही वाढेल आणि सरकारवरील भारही कमी होईल. 


मिळालेल्या लेल्या माहितीनुसार Covishield आणि Covaxin खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यास, त्यांची किंमत प्रति डोस 275 रुपये निश्चित केली जाऊ शकते. तसंच लसीच्या डोसवर 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्क देखील आकारलं जाईल. म्हणजेच एका लसीच्या डोसची किंमत खुल्या बाजारात सुमारे 425 रुपये असण्याची शक्यता आहे.


राष्ट्रीय औषध नियामक प्राधिकरणाला (NPPA) लसीची किंमत सर्वसामान्यांना परवडावी यासाठी किंमत निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या खाजगी रुग्णालयांमध्ये कोवॅक्सिनच्या एका डोसची किंमत 1,200 रुपये आणि कोविशील्डची किंमत 780 रुपये प्रति डोस ठेवण्यात आली आहे. यामध्ये 150 रुपये सेवा शुल्क देखील समाविष्ट आहे.