Camphor Benefits: 2 रुपयांचा कापूर बदलू शकतो तुमचं आयुष्य, याचे चमत्कारी गुण फारच कमी लोकांना ठाऊक आहेत
Benefits of Camphor: कापूर ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. याचे इतके फायदे आहेत की त्याची कल्पनाही करता येत नाही. ही केवळ पूजेची वस्तू नाही तर तुमच्या दैनंदिन जीवनात वापरता येणारी एक वस्तू आहे. ज्याचे फायदे अनेकांना माहित नाहीत.
How To Use Camphor: हिंदू धर्मात कापूरला खूप शुभ मानले जाते आणि यामुळे अनेक प्रकारचे त्रास दूर होतात. कापूर तुमच्या घरात सुख-समृद्धी घेऊन येतो. एवढेच नाही तर हे एक सुलभ साधन आहे जे तुमच्या दैनंदिन जीवनात वापरले जाऊ शकते. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता. याच्या मदतीने तुमच्या जीवनशैलीशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात. हा कापूर बाजारात दोन रुपयांना मिळणाऱ्या या कापूरचे इतके फायदे आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. (camphor benefits for skin benefits of camphor gives good luck)
एक कापूर अनेकांना फायदेशीर ठरतो
कापूर हे एक विशेष प्रकारचे रसायन आहे, जे विशिष्ट वनस्पतीपासून मिळते. कापूर (Benefits of Camphor) साधारणपणे 3 प्रकारचा असतो. पहिला जपानी, दुसरा भीमसेनी आणि तिसरा पत्री कापूर. कापूर पूजेसाठी, औषधासाठी आणि सुगंधासाठी वापरला जातो. नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी ही एक महान गोष्ट मानली जाते. या कापूरचा सुगंध मन एकाग्र करतो. त्याच वेळी, त्याची आग कफ आणि वात नष्ट करत असतो.
औषध म्हणून कापूर कसा वापरायचा?
कापूर तेल त्वचेमध्ये रक्त परिसंचरण सुलभ करते. हे जळजळ, पुरळ आणि तेलकट त्वचेच्या उपचारांमध्ये वापरले जाते. कापूर मिश्रित मलम सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी वापरला जातो. कापूर युक्त बाम लावल्याने मानदुखीवर आराम मिळतो. तसेच कफामुळे छातीत जडपणाला देखील कापूराचे तेल फायदेशीर आहे. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर शुंथी, अर्जुनाची साल आणि पांढरे चंदन कापूरसोबत बारीक करून त्याची पेस्ट बनवा.
वाचा : घरातून डास घालवण्यासाठी 'या' डिव्हाइसचा वापरा करा, काही मिनिटात मच्छर गायब
लक्षात ठेवा की या सर्व गोष्टींचे प्रमाण समान असावे. ही पेस्ट कपाळावर लावल्याने डोकेदुखीत खूप आराम मिळतो. सर्दी-खोकला झाल्यास गरम पाण्यात कापूर टाकून वाफ घेतल्याने खूप आराम मिळतो. खोकल्यामध्ये मोहरी किंवा तिळाच्या तेलात कापूर मिसळून पाठीवर व छातीवर हलक्या हातांनी मसाज केल्यास खूप आराम मिळतो.
केसांसाठीही कापूर फायदेशीर आहे. वाढते प्रदूषण आणि खराब पाण्याच्या वापरामुळे केस गळण्याची समस्या अधिक आहे. याशिवाय कोंड्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी खोबरेल तेलात कापूर मिसळून केसांना लावल्यास त्यांना खूप फायदा होतो.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे तज्ञांचे मत नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्या. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)
camphor benefits for skin benefits of camphor gives good luck