Camphor Benefits : कापूरचा वापर आपण सर्वजण घरात पूजा करण्यासाठी वापरतो. कापूरामध्ये अँटीबायोटिक आणि अँटीफंगल गुणधर्म असून त्याचा उपयोग फक्त पूजेतच केला जात नाही तर आरोग्य आणि सौंदर्य उत्पादनांमध्येही केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कापूर तर फायदेशीर आहेच पण कापूर तेल (Camphor Benefits)  त्यापेक्षा ही अधिक फायदेशीर आहे.


जाणून घेऊ या नक्की कापूर तेलाचे काय फायदे आहेत... 


चेहऱ्यावरील डाग 


बऱ्याच लोकांना चेहऱ्यावर डाग (Scars on the face) असल्याने त्यांची अडचण होऊन जाते. मग अशावेळेस कापराचे तेल अतिशय फायदेशीर ठरु शकते. कापराचे तेल नियमित चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर डाग पडण्याची समस्या कमी होते. तुम्ही


कापराच्या तेलात खोबरेल तेल मिसळूनही लावू शकता.


भेगा पडलेल्या टाचा


थंडीत किंवा हवामान बदलल्यावर अनेकांच्या टाचांना भेगा पडण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळेस तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी पाय स्वच्छ धुवून घ्यावे आणि मग पायाच्या भेगा पडलेल्या टाचांना कापराचे तेल लावावे त्याने तुमच्या टाचांना


आराम मिळेल आणि टाचा मऊ होतील.


आणखी वाचा... High Cholesterol वाढण्याची लक्षणं तुमच्या चेहऱ्यावरही दिसतात; दुर्लक्ष करणं पडेल महागात


पिंपल्सवर फायदेशीर


चेहरा तेलकट असल्यास चेहऱ्यावर पिंपल्स (Pimples) येण्याची शक्यता जास्त असते. त्यावर उपाय म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी कापूर तेल लावल्यास ही समस्या कमी होईल. कापूर तेलामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्रे उघडली जातात. परिणामी तुमच्या


चेहऱ्यावरील पिंपल्स येण्याची समस्या कमी होईल. 


केसामधील कोंडा कमी होईल


केसांची योग्य निगा न राखल्यामुळे केसांमध्ये कोंड्याची (Dandruff) समस्या निर्माण होते. अशावेळेस रात्री झोपण्याआधी कापूर तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसात होणाऱ्या कोंड्याचे प्रमाण कमी होईल.