High Cholesterol Symptoms: उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आजकाल अनेक लोकांमध्ये दिसून येते. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ही उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्याचबरोबर शरीरात खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढणं अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्टेरॉलशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. मात्र तुम्हाला माहितीये का? तुमच्या चेहऱ्यावर देखील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची लक्षणं दिसून येतात. जाणून घेऊया ही लक्षणं कोणती.
कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येणारी लक्षणं
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे चेहऱ्यावर घामोळ्यांची समस्या निर्माण होते. लोक सहसा त्याकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात. असं करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. कोलेस्टेरॉल वाढण्याची अनेक कारणं असली तरी या समस्येमध्ये चेहऱ्यावर घामोळ्यांची समस्या निर्माण होते.
उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येत तुमच्या त्वचेचा रंग बदलू शकतो. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग हलका काळा होऊ लागतो आणि डोळ्याभोवती छोटे दाणेही दिसू लागतात. जर तुम्हाला अशी लक्षणं दिसली तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.
सिरोसिसची समस्या अनेक कारणांमुळे असू शकतं, परंतु उच्च कोलेस्ट्रॉलमुळे तुम्ही देखील या समस्येचे शिकार होऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरात कोरडेपणा येऊ शकतो आणि खाज येऊन रक्तस्त्रावही होऊ शकतो.
चेहऱ्यावर जास्त प्रमाणात खाज येणं हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचं लक्षण मानलं जातं. जर तुमच्या चेहऱ्यावर खाज आणि लालसरपणाची समस्या खूप दिवसांपासून राहिली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
उच्च प्रमाणातील कोलेस्ट्रॉलमुळे तुमचा चेहरा, डोळे आणि नाकाजवळ लाल रंगाच्या छोट्या पुरळ उठू शकतात. याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक असू शकतं.