Cancer Tsunami In India: भारतात येणार कॅन्सरची त्सुनामी? अमेरिकन संशोधकाचा धक्कादायक दावा
लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. येत्या काळात भारतात कॅन्सरसारख्या आजाराचा अतिशय वेगानं प्रसार होईल असंही जेम अब्राहम यांनी म्हंटलंय.
Cancer Tsunami In India: गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रूग्णांमध्ये (Cancer Patients) सातत्यानं वाढ होतीय. अशातच अमेरिकेतल्या संशोधकांनी भारतासाठी धोक्याचा इशारा दिलाय. येत्या काळात भारतात कॅन्सरची त्सुनामी (Cancer Tsunami In India) येईल अशी भीती या संशोधकांनी व्यक्त केलीय. अमेरिकेतील कर्करोग तज्ज्ञ डॉ. जेम अब्राहम यांनी हा दावा केलाय.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतावर ग्लोबलायझेशनचा विपरीत परिणाम होतोय. बदलती अर्थव्यवस्था, वयोवृद्धांची वाढती संख्या आणि बदलती जीवनशैली यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आलंय. लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागतोय. येत्या काळात भारतात कॅन्सरसारख्या आजाराचा अतिशय वेगानं प्रसार होईल असंही जेम अब्राहम यांनी म्हंटलंय.
गेल्या काही वर्षात भारतात कॅन्सर रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. एका अहवालानुसार 2020 मध्ये भारतात कॅन्सर रूग्णांची संख्या 13 लाख 92 हजार इतकी होती. त्यामुळे अमेरिकन संशोधकांनी दिलेल्या धोक्याच्या इशा-याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
कॅन्सर रुग्णांची संख्या होणार दुप्पट
जागतिक कर्करोग वेधशाळेने (Globocan) वर्तवलेल्या अंदाजानुसार 2040 पर्यंत जगात कॅंसरने (Cancer) हाहाकार माजेल. 2040 पर्यंत जगात कँसर रुग्णांची संख्या 2020 च्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढलेली असेल. म्हणजे वर्षाला ही सख्या 2 कोटी 80 लाख इतकी असेल. 2020 मध्ये हीच संख्या एक कोटी 80 इतकी होती. भविष्यात जगभरात 1 कोटी लोकं या आजारामुळे मृत्यूमुखी पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लसीकरण ठरणार प्रभावी
भविष्यात कँसर रुग्णांचा वाढता आकडा रोखायचा असेल तर त्यावर लसीकरण (Vaccination) हा एकमेव पर्याय असल्याचं डॉक्टर अब्राहम यांनी म्हटलंय. गेल्या काही वर्षात कँसरवर वेगवेगळ्या लसी बनवण्यात आल्या आहेत. पण सध्या या सर्व लसींची चाचणी होत आहे. सकारात्मक गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यात या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. क्वीवलेंड क्लिनिक ब्रेस्ट कँसरवरही लस तयार करत आहे.