रात्रीची झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असते. जर आपण रात्री पूर्ण झोप घेतली नाहीतर दुसऱ्या दिवशीच्या नॉर्मल गोष्टी करणंही अवघड होऊन जातं. रात्री नीट झोप न घेतल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो आणि चेहराही उतरलेला दिसतो. रात्री झोप येत नसेल तर करा या गोष्टी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

-काही लोकांना झोपताना त्यांची उशी आवडते. झोपताना ते आपली उशी घेऊनच झोपतात. जर तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्ही आत्ताच बदलून टाका. जास्त उशी घेतल्याने तुमची मान उंच होते आणि तुम्ही घोरायची सवय लागते. त्यामुळे तुमची झोपही खराब होऊ शकते. 


-जर तुम्हाला अस्वस्थतेमुळे झोप येत नसेल, तर सर्वप्रथम तुमच्या मनात सकारात्मक विचार आणा आणि Soft Music ऐका, यामुळे तुम्हाला आराम वाटेल आणि झोपही चांगली येईल.


-तुम्ही तुमची झोपण्याची वेळ रोज निश्चित करावी आणि त्यात फारसा बदल करू नका. असं केल्यानं तुमच्या मेंदूमध्ये  sleeping cycles  निश्चित होईल आणि मग झोप येण्यात कोणतीही अडचण येणार नाही.


-झोपण्यापूर्वी नेहमी साध्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल. पाण्यामुळे शरीराचे तापमान कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. त्यामुळे झोपही चांगली लागेल.