Tips For Good Sleep: झोप आयुष्यातील परम सुख आहे असं म्हटलं जातं. कारण दिवसभर काम आणि मानसिक ताणताणवांना सामोरं गेल्यानंतर रात्रीची झोप महत्त्वाची आहे. रात्री शांत झोप लागल्यानंतर येणारा दिवस उत्साहात जातो. पण काही जणांना दिवसभर थकवा आणि मानसिक तणाव असूनही शांत झोप येत नाही. यामुळे येणारा दिवस कंटाळवाणा आणि आळस भरलेला राहतो. तसेच मधुमेह, बीपी, स्थुलता, डिप्रेशन यासारखे आजारांना निमंत्रण मिळतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते एका व्यक्तीला 24 तासात कमीत कमी 8 तास झोप घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल तर या टिप्स नक्की वाचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शांत झोपेसाठी या टिप्स फॉलो करा


  • सर्वप्रथम तुमची झोपण्याची वेळ रोज निश्चित करा आणि त्यात बदल करू नका. यामुळे मेंदूत झोपेचे चक्र निश्चित होईल आणि झोप येण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

  • काही लोकांना एकापेक्षा जास्त उशा घेऊन झोपण्याची सवय असते. जर तुम्हालाही ही सवय असेल तर आजच बदला. जास्त उशी घेतल्याने तुमची मान उंच होते आणि तुम्ही घोरायला लागतात, तसेच झोपेचा त्रासही होऊ शकतो.

  • अनेकदा बिछान्याच्या पायाखालची बाजू एकदम खालच्या बाजूला असते. जर असं असेल तर गादी थोडी उंच करा. कारण झोपण्यासाठी ही सर्वोत्तम स्थिती असून पायाकडून हृदयाकडे रक्ताचा प्रवाह होतो. 

  • झोप येण्यापूर्वी बिछान्यावर लोळणं टाळा. कारण बऱ्याचदा निद्रानाशाचे प्रमुख कारण ठरते. कारण झोप येण्यापूर्वी बिछान्यावर पडताना मेंदूचे कार्य चालू असते. यामुळे अनेकांना अर्धवट झोप मिळते. मेंदू थकल्यावर आणि झोप आल्यावरच बिछान्यावर झोपायला जा.

  • अस्वस्थेतेमुळे तुम्हाला झोप येत नसेल तर मनात सर्वप्रथम सकारात्मक विचार आणा. यासाठी बेडरुममध्ये शांत संगीत ऐका. यामुळे तुम्हाला आराम वाटेल आणि झोपही चांगली येईल. 

  • चांगल्या आरोग्यासाठी सकाळी उठल्यावर भरपूर नाश्ता करा. त्यानंतर दुपारचं जेवण थोडं कमी करा. त्यानंतर रात्री सर्वात कमी होईल तितकं जेवण घ्या. झोपण्यापूर्वी दोन ते तीन तास आधी जेवण घेणं फायदेशीर ठरेल.

  • मद्यपान आणि धुम्रपान टाळा. मद्यपान केल्याने चांगली झोप येते हा चुकीचा समज आहे. तसेच सिगारेटमधील निकोटीनसारख्या घटकामुळे झोपेचं चक्र बिघडतं.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)