मुंबई : बदलत्या आणि दिवसेंदिवस अधिक दगदगीच्या झालेल्या जीवनमानामुळे रक्तदाबाचा त्रास हा अगदी सामान्य झाला आहे. आबालवृद्धांमध्ये रक्तदाबाचा त्रास हा अगदी सहज आढळून येतो. 


उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च रक्तदाबाइतकाच लो बीपी म्हणजेच रक्तदाब कमी होणं हा त्रासही तितकाच धोकादायक असतो. अचानक घाम येणं, अस्वस्थ वाटणं, चक्कर येणं ही रक्तदाब नियंत्रणाबाहेर गेल्याची सर्वसामान्य लक्षण आहे. 


वेळीच रक्तदाबाच्या समस्येकडे लक्ष न दिल्यास भविष्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे सुरूवातीच्या टप्प्यामध्येच रक्तदाबाच्या समस्येवर  नियंत्रण ठेवायचे असल्यास आहारात वेलचीचा समावेश करावा.  


घरगुती उपाय -  


एका संशोधनाच्या माहितीनुसार, वेलची सिस्टोलिक आणि डायस्टोलिक म्हणजेच रक्तदाबाची नियंत्रित पातळी राखण्यासाठी मदत करते. या रक्तदाबाचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते. 


कसा कराल वापर ? 


200 ग्रॅम बडी वेलची ( काळ्या रंगाची मोठी, मसाल्याची वेलची ) तव्यावर गरम करा. त्याची जळून राख होईपर्यंत त्याला गरम करा. या वेलचीची पूड करा. 


वेलचीची पूड हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा. 


सकाळी अनशीपोटी आणि रात्री जेवणापूर्वी 1 तास आधी 5 ग्राम पूड आणि 2 चमचे मध यांचे एकत्र मिश्रण करून चाटण बनवा. 


नियमित 15-20 दिवस हा उपाय केल्यास रक्तदाबाचा त्रास आटोक्यात येण्यास मदत होते. 


खास टीप :  कोणताही घरगुती उपायाला वैद्यकीय उपाचाराला पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे योग्य तज्ञांच्या सल्ल्याने आणि औषधोपचारासह घरगुती किंवा नैसर्गिक उपचारांची मदत घ्या.