Carrot Juice Benefits: जेव्हा आपण निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला अर्थातच निरोगी पदार्थांचा अवलंबही करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत गाजर आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. जमिनीखाली पिकवलेली ही भाजी म्हणजेच गाजराचे आपण वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करू शकतो. त्यात गाजराचे ज्यूस हे अत्यंत फायदेशीर असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाजरांमध्ये असतात 'ही' जीवनसत्त्वे... 
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि मिनिरल्स असतात. गाजराचा हलवा तुम्हाला फायदेशीर ठरत नाही तर गाजराचा ज्यूस तुमच्या शरीराला फायदेशीर आहे. 


गाजराचा रस पिण्याचे फायदे काय आहेत? 


- जर तुम्ही नियमितपणे गाजराचा रस प्यायला तर तुमच्या चेहऱ्यावर एक चमक येते. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होत असेल तर गाजराचा रस तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. 


- गाजराचा रस नियमित प्यायल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते आणि तुम्हाला जास्त थकवा येत नाही.


- ज्या लोकांना हिरड्यांमधून रक्त येत असेल त्यांनी गाजराचा रस प्यावा. त्यामुळे दातांची चमकही वाढते.


- तुमचा खोकला थांबत नसेल तर गाजराचा रस काळी मिरी आणि साखरेसोबत मिसळून प्या.


-  गाजरांमध्ये फायबरसारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांचा समावेश असतो ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि त्यामुळे वजन कमी करणे सोपे होते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचारावर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)