Hair Roots Pain : तुमच्याही केसांची मुळं दुखतायत? नक्का करा हे उपाय, आराम मिळालाच म्हणून समजा
वेदना दूर करण्यासाठीचे काही उपाय तुम्ही कधी करून पाहिले आहेत का?
Hair Roots Pain treatment : डोकेदुखीच्या तक्रारींमध्ये कधीकधी केसांच्या मुळांमध्ये वेदना असल्याच्या तक्रारीसुद्धा समोर येतात. अनेकदा मुळांमध्ये असणाऱ्या वेदना व्यक्तीला संतापही देऊन जातात. अशा वेदना दूर करण्यासाठीचे काही उपाय तुम्ही कधी करून पाहिले आहेत का?
केसांच्या मुळात वेदना का होतात ?
केसांच्या मुळांमध्ये होणाऱ्या वेदनांची बहुविध कारणं आहेत. सर्वप्रथम तर जर तुम्ही एखादी हेअरस्टाईल केली असेल तर वेदना होणं निश्चित आहे.
याशिवाय स्कॅल्प इंन्फेक्शन अर्थात डोक्यावरील त्वचेची अस्वच्छता, आर्द्रतेचा अभाव ही कारणंही असू शकतात. अशा प्रसंगी अनेकदा डोक्यावर असणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज येते. ज्यामुळं आजुबाजूच्या नसांवर असणारा ताण वाढतो आणि केसांची मुळं दुखू लागतात.
वेदना कमी करण्याचे उपाय काय ?
- केस कधीच घट्ट बांधू नका. शक्य तितके सैल केस बांधण्याचा प्रयत्न करा.
- डोक्यावरची त्वचा कोरडी ठेवण्याचा आणि योग्य तिच उत्पादनं केसांसाठी वापरण्याचा प्रयत्न करा.
- डोक्यावरील त्वचा स्वच्छ ठेवण्याचा कायम प्रयत्न करा. केसांची मुळं दुखण्याचं हे मुख्य कारण असू शकतं.
- केस अस्वच्छ असल्या कारणानं डोक्यावरील त्वचेमध्ये जीवजंतू सहजपणे फोफावतात आणि त्यामुळं केसांची मुळं वेदना देतात.
- अनेकदा प्रमाणाहून जास्त कोरडी त्वचा आणि दीर्घकाळासाठी केस न धुणं या वेदनेमागचं कारण ठरतं. यासाठी कोरफडीचा गर केसांच्या मुळांवर चोळून काही वेळानं तो धुणं फायद्याचं ठरेल.
- तेलानं केसांच्या मुळाशी केलेला मसाजही नेहमीच फायद्याचा ठरतो. पण, त्यानंतर हे तेल स्वच्छ करणंही तितकंच महत्त्वाचं