छातीत जळजळ होतेय?; ही Acidity नाही तर पोटाचा कॅन्सर असण्याची शक्यता, `या` 2 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका
Stomach Cancer Symptoms : पोटात आणि छातीत जळजळ ही अनेकांना आजकाल होत असते. सर्वसामान्यपणे आपण पोटात आणि छातीत जळजळ झाल्यास Acidity त्रास होतोय असं म्हणतो. पण वारंवार हा त्रास होत असेल तर पोटाचा कर्करोग होण्याची भीती देखील असू शकते.
Stomach Cancer Symptoms : बाहेरचे खाद्यपदार्थ, कामाचा तणाव, तासंतास काही न खाणे, तेलकट आणि मसालेदार पदार्थ आणि झोप अपुरी राहिल्यामुळे असंख्य लोकांना Acidity चा त्रास होतो. वारंवार जर तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. तुमचं दुर्लक्ष करणे हे तुम्हाला महागात पडू शकतं. अॅसिडिटी झाल्यास पहिलं लक्षण म्हणजे पोटात किंवा छातीत जळजळ होते. अशा स्थिती तुम्हाला आंबट ढेकरे येणे, अंगावर सूज ज्यामुळे तुमचं वजन वाढल्यासारखं वाटतं. ही साधारण वाटणारी अॅसिडिटीची लक्षणं पोटाचा कर्करोगाचीही असू शकतात. (chest burn It is not Acidity but the possibility of stomach cancer dont ignore these 2 symptoms)
'या' 2 लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका!
डॉ. पिंकी थापर, डायरेक्टर, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, ज्यूपिटर हॉस्पिटल, ठाणे, मुंबई यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिलीय. त्या म्हणतात की, वयानुसार आपले जुने आजार डोकं वर काढतात. साधारण 60 वर्षांनंतर आरोग्याची विषेश काळजी घ्यायला हवी. पण सध्याचा लाइफस्टाइल पाहता, आजचा पिढीने 40 नंतरच आरोग्याबद्दल जागृत राहणे फारच गरजेचे आहे. ऑफिस वर्क आणि घर यांचा तालमेळ करताता आज जोडप्यांचा आरोग्याकडे दुर्लक्ष होतो. त्यामुळे या पिढीने वर्षातून एकदा तरी पूर्ण हेल्थ चेक करावा.
छातीत जळजळ ही एक सामान्य वाटत असेल तर हे बॅक्टेरियाच्या संसर्गाचे किंवा पोटातील अल्सरचे लक्षण असू शकतं. कर्करोग असलेल्या काही लोकांना छातीत जळजळ आणि अॅसिडिटी रिफ्लक्सचा त्रास होतो. ज्यामुळे ढेकर आणि उचकीचे प्रमाण वाढतं. हा कर्करोग गॅस्ट्रिक कॅन्सर म्हणून ओळखला जातो, त्यावर वेळेच उपचार घेतला नाही तर, परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकतं.
पोटाच्या कॅन्सरचं कारण
जर तुम्हाला वारंवार अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर पोटात पायलोरीचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या त्रासामुळे डीएनए खराब होण्याची भीती असते. यामुळे भविष्यात तुम्हाला पोटाचा कर्करोग होण्याची भीती बळावते. पोटाचा कर्करोग टाळण्यासाठी सर्वप्रथम तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा. तसंच या काळात वजन वाढू देऊ नका, त्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराचे पालन करा. झोपण्याचा दोन तीन तासापूर्वी जेवण्याची सवय लावा. दैनंदिन जीवनात चालण्याचा सवय लावा. अमंली पदार्थापासून दूर रहा.
या आजाराची लक्षणे योग्य वेळी ओळखली तर त्यावर उपचार करणे शक्य होतं, असं तज्ज्ञ सांगतात. यामध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी इत्यादींचा समावेश असतो. पोटाचा कर्करोग साधारण लक्षणं छातीत जळजळ दीर्घकाळ राहते, श्वास घेण्यास त्रास होतो, चिकट आणि काळे मल, कावीळ, गिळण्यास त्रास आणि सतत उलट्या होतात. ही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)