मुंबई : लहान मुलं खेळत असताना अनेक उपद्व्याप करतात. असं उत्तर प्रदेशमध्ये एका चिमुकल्याने खेळता खेळता पराक्रम केले आहेत की पालक बाळाला घेऊन थेट डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनाही या चिमुरड्या दीड वर्षांच्या मुलाचे प्राण वाचवले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झालं असं की, या मुलाचं डोकं खेळता खेळता प्रेशर कुकरमध्ये अडकलं. डोकं कुकरमध्ये अडकल्यानंतर हा मुलगा बैचेन झाला. पालकांनी त्याचं डोकं बाहेर काढण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. अखेर मुलाला तशाच अवस्थेत घेऊन पालक रूग्णालयात पोहोचले. डॉक्टरांच्या टीमने तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाळाचे प्राण वाचले आहेत.


डॉक्टरांनी सर्वप्रथम मुलाचे डोकं कुकरमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न यशस्वी झाला नाही. तेव्हा डॉक्टरांनी ग्लायडर मशीन मागवली. आणि कुकर दुसऱ्या बाजूने कुकुर हळू हळू कापला. मशीनच्या आवाजाने ते मूल खूप घाबरलं होतं.


सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर, कुकर कापून मुलाचे डोके बाहेर काढण्यात यश आलं. डॉ. फरहत खान यांनी सांगितलं की, डोकं अडकलं असल्याने ते मूल खूप अस्वस्थ होतं. त्याचं डोकं कुकरमध्ये अडकलं असल्याने त्याला बेशुद्ध करणं देखील शक्य नव्हतं. जेव्हा कुकर कापला जात होता, तेव्हा ते मूल घाबरून थरथरत होतं. ज्यामुळे डॉक्टरांच्या टीमला खूप त्रास झाला होता. 


पीडित मुलाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फार चांगली नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले नाहीत. डॉक्टरांनी सांगितलं की, मुलाची प्रकृती ठीक असून त्याला घरी पाठवण्यात आलं आहे.